किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशभोपाळ, (११ डिसेंबर) – भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली. डॉ. मोहन यादव यांना मध्य प्रदेशचे नवे मुख्यमंत्री करण्याची घोषणा करण्यात आली. ते दक्षिण उज्जैनचे आमदार आहेत आणि शिवराज सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री राहिले आहेत. मध्य प्रदेशमध्ये आज (११ डिसेंबर) भारतीय जनता पक्ष (भाजप) विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. ११ डिसेंबर रोजी भाजप प्रदेशाध्यक्षांनी निवडून आलेल्या सर्व आमदारांना प्रदेश कार्यालयात उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. यासोबतच जगदीश देवरा आणि राजेश शुक्ला हे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात. नरेंद्र तोमर यांना स्पीकर केले जाऊ शकते.
डॉ. मोहन यादव हे उज्जैन दक्षिणचे आमदार आहेत. डॉ. मोहन यादव २०१३ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. यादव हे शिवराज सिंह सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री राहिले आहेत. याशिवाय ते आरएसएसचेजवळचे मानले जातात. दुसरीकडे आदिवासी नेते विष्णुदेव साई यांना छत्तीसगडचे मुख्यमंत्री केले जाणार आहे. विष्णुदेव साईंची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर खासदारकीची जबाबदारी पक्ष नव्या चेहर्याकडे सोपवणार की शिवराजसिंह चौहान यांच्यासारखा दिग्गज नेता पुन्हा एकदा येणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. मात्र यावरील आता पडदा उठला आहे.
उज्जैन दक्षिण मतदारसंघातून मोहन यादव यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार चेतन प्रेमनारायण यादव यांचा १२९४१मतांनी पराभव केला. मोहन यादव यांना ९५६९९ तर चेतन प्रेमनारायण यादव यांना ८२७५८ मते मिळाली. मोहन यादव हे आरएसएसच्या अत्यंत जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जातात, अशी माहिती आहे. २०१३ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले.