किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तरप्रदेश या तीन राज्यांमध्येही विधानसभेच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. सत्तांतरानंतर मध्यप्रदेशातील निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले होते. कारण, या निवडणुकीच्या निकालावर शिवराजसिंह चौहान यांच्या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. जनमत कौलनुसार, या राज्यात भाजपाला १६ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास चौहान सरकार बहुमतात येईल आणि सरकारवरील धोकाही दूर होईल.
मध्यप्रदेशात २८ जागांसाठी मतदान झाले यातील १६-१८ जागा भाजपाला, तर १०-१२ जागा कॉंगे्रसला मिळण्याची शक्यता आहे. कॉंगे्रसच्या सुमारे २५ आमदारांनी यावर्षीच्या सुरुवातीला पक्षाचा राजीनामा देऊन, भाजपात प्रवेश केला होता. याच रिक्त जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.
ज्योतिरादित्य शिंदेंची प्रतिष्ठा पणाला
शिवराजसिंह चौहान यांच्या मंत्रिमंडळातील १४ मंत्र्यांचे भवितव्य या निवडणुकीत पणाला लागले आहे. यातील ११ जण कॉंगे्रस सोडून भाजपात आले आहेत. भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हाकेला दाद देऊन हे सर्व जण भाजपात आले असल्याने, अर्थात्च शिंदे यांची प्रतिष्ठाही नक्कीच पणाला लागली आहे. यात तुलसी सिलावट, गोविंदसिंह राजपूत, राम चौधरी, इमरती देवी, प्रद्युम्नसिंह तोमर, महेंद्रसिंह सिसोदिया, गिरिराज दंडेातिया, ओ. पी. एस. भदौरिया, सुरेश धाकड, ब्रजेंद्रसिंह यादव, राज्यवर्धन सिंह, एदलसिंह कंसाना, बिसाहूलाल आणि हरदीपसिंह डंग यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
ज्या २२ आमदारांनी शिंदे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला होता, त्यातील १६ आमदार हे ग्वाल्हेर आणि चंबल परिसरातील आहेत. या भागात शिंदे घराण्याचे वर्चस्व असल्याने, येथील बहुतांश जागा जिंकून, आपला प्रभाव अजूनही कायम असल्याचे त्यांना सिद्ध करावे लागणार आहे.
योगींची लोकप्रियता कायम
उत्तरप्रदेशात मात्र योगी आदित्यनाथ यांनी आपली लोकप्रियता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. हाथरससह अन्य घटनांवरून कॉंगे्रसने योगी सरकारवर आरोपांच्या फैरी झाडल्या असल्या, तरी त्याचा पोटनिवडणुकीवर कुठलाही परिणाम झाल्याचे दिसत नाही; कारण राज्यातील आठपैकी सात जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता जनमत चाचण्यांनी व्यक्त केली आहे.