किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.64°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, ७ नोव्हेंबर – बिहार विधानसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर काही वेळातच विविध टीव्ही वाहिन्यांनी आपापले जनमत चाचण्यांचे कल जाहीर केले. यात राजदचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक ४४ टक्के लोकांनी पसंती दिल्याचे दिसून आले. राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करणार असल्याचे संकेतही यातून मिळाले आहेत.
रिपब्लिक- जन की बात या वाहिनीच्या अंदाजानुसार, राजद-कॉंगे्रसचा समावेश असलेल्या महाआघाडीला ११८ ते १३८ जागा मिळतील आणि सत्ताधारी रालोआला ९१ ते ११७ जागा मिळण्याची शक्यता आहे.
टाईम्स नाऊ-सी व्होटरने केलेल्या पाहणीतही महाआघाडी सत्तेत येत असून, त्यांना १२० जागा मिळण्याची शक्यता आहे. रालोआ ११६ जागा जिंकताना दिसत आहे. लोजपाच्या खात्यात १ जागा तर इतरांना ६ जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे.
एबीपी-सी वोटरच्या अंदाजात, महाआघाडीला १०८-१३१ जागा मिळतील, तर रालोआला १०४-१२८ जागा मिळताना दिसत आहेत. चिराग पासवान यांच्या लोजपाला केवळ १-३ जागा मिळतील, अशी अपेक्षा आहे.
टुडे-चाणक्यच्या जनमत चाचणीनुसार, महाआघाडीला १६९ ते १९१ जागा मिळण्याचा अंदाज असून, रालेआला ४४ ते ५६ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना ४ ते १२ जागा मिळतील. तर टीव्ही ९-भारतवर्ष या संस्थेच्या मते, महाआघाडीला ११५ ते १२५, रालोआला ११० ते १२० आणि इतरांना १० ते १५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
निवडणुकीचे प्रत्यक्ष निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होणार असले, तरी बहुतेक सर्वच जनमत चाचण्यांनी महाआघाडीकडे सत्ता सोपवली आहे. तेजस्वी यादव यांच्यावर लोकांचा विश्वास असल्याचेही यात दिसून आले. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना ३५ टक्के लोकांनी पसंती दिली. सलग १५ वर्षे सत्तेत असलेले नितीशकुमार यांना यावेळी मोठा झटका बसणार असल्याचे टीव्ही वाहिन्यांच्या पाहणीत दिसून आले आहे.
तिथेच नितीशकुमार यांचे नेतृत्व नाकारताना, रालोआतून बाहेर आलेले लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांना केवळ ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. त्यांच्या पक्षाने १३५ जागांवर उमेदवार उभे केले असून, यातील बहुतांश जागांवर नितीशकुमार यांच्या जदयूचे उमेदवार आहेत.
विकास, बेरोजगारी, महागाईवर झाले मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीत विकास, बेरोजगारी आणि महागाई या तीन मुख्य मुद्यांवर मतदान करण्यात आले. यातही लोकांनी विकासाला फार जास्त महत्त्व दिले. सुमारे ४२ टक्के लोकांनी विकास, तर ३० टक्के लोकांनी बेरोजगारीचा मुद्दा महत्त्वाचा मानला. ११ टक्के लोकांनी महागाई मुख्य मुद्दा असल्याचे म्हटले आहे.
अंतिम टप्प्यात ५५.२२ टक्के मतदान
बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसर्या आणि अंतिम टप्प्यात आज शनिवारी ५५.२२ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान सुरू होते, त्यामुळे ही टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाने वर्तवली आहे.
बिहारचे प्रभारी असलेले निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण सिन्हा यांनी याबाबतची माहिती दिली. ५५.२२ ही टक्केवारी सायंकाळी पाच वाजताची आहे. मतदानाची प्रक्रिया सहापर्यंत सुरू होती. दुर्गम भागातील आकडेवारी अद्याप आलेली नाही, असे त्यांनी सांगितले. प
आजच्या टप्प्यात ७८ मतदारसंघांमध्ये मतदान घेण्यात आले. यासाठी १,२०४ उमेदवार रिंगणात होते. सकाळी सात वाजता ३३,७८२ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला मतदारांमध्ये पाहिजे तसा उत्साह दिसून आला नसला, तरी दुपारनंतर मोठ्या संख्येत मतदार घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. कोरोनाच्या संकटात प्रथमच घेण्यात आलेल्या या निवडणुकीत सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले होते, असे सिन्हा यांनी सांगितले.