किमान तापमान : 24.99° से.
कमाल तापमान : 26.04° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 65 %
वायू वेग : 2.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
24.85°से. - 28.15°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.65°से. - 28.75°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.74°से. - 28.47°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल24.32°से. - 29.01°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.06°से. - 28.38°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर साफ आकाश23.5°से. - 28.34°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादल-हिरव्या लिफाफ्यात आढळले पत्र,
इंदूर, (२६ मार्च) – मध्यप्रदेशच्या इंदूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकार्याला ‘सर तन चे जुदा’ची धमकी देण्यात आली आहे. संतोष शर्मा असे पीडित व्यक्तीचे नाव असून, ते विहिंपच्या धर्म प्रसार विभागाचे प्रांत संयोजक आहेत. ही धमकी त्यांना एका पत्राच्या माध्यमातून देण्यात आली. त्यांच्या गाडीच्या वायपरवर हिरव्या रंगाच्या पाकिटात हे पत्र ठेवलेले होते. मुस्लिम समाजातील लोकांविरोधात सुरू असलेल्या कामापासून दूर राहण्याचा सल्ला या पत्रातून देण्यात आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण इंदूरच्या मुसाखेडी भागाशी संबंधित आहे. विहिंपचे पदाधिकारी संतोष शर्मा हे येथील गोकुळ रेसिडेन्सीमध्ये राहतात. शुक्रवारी त्यांनी आपल्याला धमकावल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. आपल्या इनोव्हा गाडीने सहकारी शरद आणि चालक योगेश यांच्यासह आपण बाजारात फळे आणण्यासाठी गेलो होतो. एका रेस्टॉरंटसमोर गाडी पार्क केली आणि सगळ्यांबरोबर आत गेलो. आपण परत ओला असता गाडीच्या वायपरवर हिरव्या रंगाचा लिफाफा आढळून आला, असे संतोष शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
विशेष म्हणजे, इंदूरमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधी बजरंग दलाचे पदाधिकारी तन्नू शर्मा, अधिवक्ता अनिल नायडू आणि अधिवक्ता मनीष गडकर यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत.