किमान तापमान : 26.73° से.
कमाल तापमान : 26.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 3.19 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.99° से.
24.55°से. - 27.39°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.91°से. - 28.4°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.77°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.68°से. - 28.73°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर घनघोर बादल24.16°से. - 28.59°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.07°से. - 27.85°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर टूटे हुए बादल– भारत-नेपाळ सीमेवरील सुरक्षेत वाढ,
चंदीगढ, (२६ मार्च) – खलिस्तानी अमृतपालसिंगचा शोध अजूनही सुरू आहे. आधी पतियाळा, नंतर हरयाणातील शाहबाद आणि नंतर उत्तरप्रदेशातील लखीमपूर खेरी अशाप्रकारे अमृतपाल सतत आपली ठिकाणे बदलत आहे. तो दिल्लीतही दिसल्याचे सांगितले जाते. उत्तरप्रदेश सीमेवरून तो नेपाळमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू शकतो, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशच्या बहराईचमधील सीमेवर बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या व्यतिरिक्त उत्तराखंडमधील सीमेवरही यंत्रणांचे बारीक लक्ष आहे.
नेपाळच्या सीमेला लागून असलेले शेवटचे गाव मेला घाट येथे ठिकठिकाणी अडथळे लावून तपासणी करत असलेले झनकैया पोलिस ठाण्याचे अधिकरी म्हणाले, पोलिसांकडून सातत्याने सखोल तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. येणार्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात आहे. यासोबतच ठिकठिकाणी पोस्टर चिकटवण्यात आले असून, या गुन्हेगारांना कोणीही मदत अथवा आश्रय देऊ नये, असा मजकूर यात आहे. मदत किंवा आश्रय देणार्यांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अटकेसाठी प्रयत्न सुरू
अमृतपालसिंगला पंजाब पोलिसांनी फरार घोषित केले. पोलिसांनी अमृतपालला पकडण्यासाठी शोधमोहीम राबवली असून, ही मोहीम सुरूच आहे. पोलिसांनी अमृतपाल आणि त्याच्या समर्थकांवर कारवाई सुरू केली आहे.
कोण आहे अमृतपाल सिंह?
‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंगचा जन्म १९९३ मध्ये अमृतसर जिल्ह्यातील जल्लुपूर खेडा गावात झाला. तो तरसेमसिंग यांचा मुलगा आहे. अमृतपाल २०१२ मध्ये वयाच्या १९ व्या वर्षी पंजाबहून दुबईला नोकरीसाठी गेला होता. तो १० वर्षे म्हणजे २०२२ पर्यंत दुबईत राहिला. यादरम्यान त्याचे केस आणि चेहर्यावर दाढी वाढवलेली नव्हती.
२०२२ मध्ये दुबईहून भारतात परतला
अमृतपालच्या काकांचा दुबईत ट्रान्सपोर्टचा व्यवसाय होता. शेतकरी आंदोलनादरम्यान अमृतपाल दीप सिद्धूसोबत दिल्ली सीमेवर आला होता. तो ऑगस्ट २०२२ मध्ये दुबईहून भारतात आला होता. त्याने सप्टेंबर २०२२ मध्ये पुन्हा केस ठेवून दस्तरबंदी केली आणि मोगाच्या रोडे गावात दस्तरबंदीचा मोठा कार्यक‘म केला. त्यानंतर तो दीप सिद्धूच्या ‘वारिस पंजाब दे’ या संघटनेचा प्रमुख बनला. अमृतपालने पंजाबमध्ये धार्मिक यात्राही सुरू केली. खलिस्तानी चळवळीत ग‘ामीण तरुणांना सामील करण्यास सुरुवात केली.