किमान तापमान : 27.51° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.91 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.6°से. - 31.02°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– योगी आदित्यनाथ यांची छत्तीसगडमध्ये गर्जना,
कावर्धा, (०५ नोव्हेंबर) – भाजपा छत्तीसगडमध्ये सत्तारूढ झाल्यास ‘लव्ह जिहाद’ आणि गो-तस्करीच्या नावाने अराजकता पसरवणार्यांवर कारवाई करण्यात येईल, अशी गर्जना उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. शनिवारी छत्तीसगडमधील कावर्धा विधानसभा मतदारसंघातील सभेला संबोधित करताना आदित्यनाथ यांनी काँग्रेस देश, समाज आणि जनतेसाठी समस्या असल्याचे म्हटले. छत्तीसगडमधील २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय ही चूक झाल्याचा उल्लेख करीत आदित्यनाथ म्हणाले की, रामनवमीच्या मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली होती, तर ‘लव्ह जिहाद’ला विरोध करणार्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
उत्तरप्रदेशात भाजपाचे दुहेरी इंजिनचे सरकार आहे. तेथे ‘लव्ह जिहाद’वर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या विरोधात कायदा करण्यात आला आहे. कोणीही बेकायदेशीरपणे धर्मांतर करू शकत नाही. जर कोणी असे कृत्य करत असेल, तर त्याला परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही आदित्यनाथ यांनी दिला. येथील लोकांनी छत्तीसगडमध्येही भाजपाचे सरकार सत्तारूढ करावे, असा माझा आग्रह आहे. काँग्रेस लव्ह जिहाद, गो-तस्करी, खाण माफिया यांच्या नावाखाली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा कृत्यांच्या विरोधात उत्तरप्रदेशप्रमाणेच येथेही कारवाई केली जाईल. मग कोणतीही अडचण येणार नाही, असेही आदित्यनाथ यांनी ठणकावले.