किमान तापमान : 23.32° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 46 %
वायू वेग : 4.32 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
22.49°से. - 25.53°से.
रविवार, 12 जानेवारी साफ आकाश23.62°से. - 27.14°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल24.17°से. - 25.97°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.55°से.
बुधवार, 15 जानेवारी छितरे हुए बादल23.64°से. - 26°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल24.67°से. - 27.56°से.
शुक्रवार, 17 जानेवारी टूटे हुए बादलसिवनी, (०५ नोव्हेंबर) – काँग्रेसने आदिवासींच्या हितासाठी कधीच काम केले नाही. दुसरीकडे काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते आपल्या मुलांना राजकारणात स्थापित करण्यासाठी आणि राज्यातील पक्ष संघटनेवर ताबा मिळविण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केला. मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी आले असता, त्यांनी सिवनी जिल्ह्यात जाहीर सभेला संबोधित केले. ते म्हणाले, आम्ही प्रभू श्रीरामाला पुरुषोत्तम राम बनवणार्या आदिवासींचे शिष्य आणि उपासक आहोत. काँग्रेसवर निशाणा साधताना ते म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर देशात पाच-सहा दशके सत्तेत राहूनही काँग्रेसने आदिवासी समाजाच्या हितासाठी काहीही केले नाही. ८० कोटी गरीब लोकांना मोफत रेशन देणारी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना पुढील पाच वर्षांसाठी वाढवली जाईल, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.
यावेळी त्यांनी भाजपा सरकारने आदिवासींच्या विकासासाठी केलेल्या कामांची यादीच वाचून दाखवली आणि विविध घोटाळ्यांवरून मागील काँग्रेस सरकारचा खरपूस समाचार घेतला. २०१४ पूर्वी काँग्रेसच्या राजवटीत लाखो-कोट्यवधी रुपयांचे घोटाळे झाले, मात्र भाजपा सरकारच्या काळात असा कोणताही प्रकार घडला नाही आणि त्यामुळे वाचलेला पैसा गरीब जनतेला मोफत रेशन देण्यासाठी खर्च केला जात असल्याचे ते म्हणाले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजपा सत्तेत आल्यावर देशात प्रथमच आदिवासींच्या कल्याणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसला केवळ एकाच कुटुंबाची काळजी
काँग्रेसला फक्त एका कुटुंबाची काळजी होती. रस्ते आणि गल्ल्यांना त्यांची नावे देण्यात आली. त्यांच्या जाहीरनाम्यातही त्यांची नावे आहेत, असे कोणाचेही नाव न घेता पंतप्रधानांनी हल्ला चढवला. काँग्रेस राज्यात निवडणूक लढवत नाही, परंतु त्यांचे दोन मोठे नेते एकमेकांशी लढत आहेत, असे त्यांनी कमलनाथ आणि दिग्विजयसिंग यांचे नाव घेता म्हटले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची यादीच लोकांपुढे सादर केली.