किमान तापमान : 25.41° से.
कमाल तापमान : 26.46° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 8.35 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.46° से.
23.58°से. - 26.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, (१८ फेब्रुवारी ) – केजरीवाल सरकारच्या उत्पादन शुल्क घोटाळ्यात मुख्य आरोपी असलेले दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने समन्स बजावला असून, त्यानुसार त्यांना रविवारी दिल्लीतील सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी हजर राहायचे आहे. सीबीआयने या प्रकरणात तीन महिन्यांपूर्वी आरोपपत्र दाखल केले होते. यात सिसोदिया यांना आरोपी क्रमांक एक असे संबोधले आहे. त्यानंतर सीबीआयने सिसोदिया यांना प्रथमच समन्स जारी केला. विशेष म्हणजे, उत्पादन शुल्क विभागाचा कारभार सिसोदिया यांच्याकडेच आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी सीबीआयने सिसोदिया यांची चौकशी केली होती तसेच त्यांच्या घराची आणि बँक लॉकर्सची झडतीही घेतली होती.
रविवारच्या चौकशीत सीबीआय त्यांना पैशाचा स्रोत आणि उत्पादन शुल्क तयार करताना झालेल्या व्यापक फौजदारी कटाविषयी विचारणा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, सिसोदिया यांनी या समन्सवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. मोदी सरकारकडून सीबीआय, ईडी आणि अन्य तपास संस्थांचा शस्त्र म्हणून वापर केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.