किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.94 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.99°से. - 28.58°से.
सोमवार, 25 नोव्हेंबर घनघोर बादल24.07°से. - 29.1°से.
मंगळवार, 26 नोव्हेंबर टूटे हुए बादल24.12°से. - 28.81°से.
बुधवार, 27 नोव्हेंबर घनघोर बादल23.93°से. - 29.28°से.
गुरुवार, 28 नोव्हेंबर टूटे हुए बादल23.59°से. - 28.72°से.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर कुछ बादल22.96°से. - 28.47°से.
शनिवार, 30 नोव्हेंबर घनघोर बादलजयपूर, (१ मार्च) – आंतरराष्ट्रीय महिला दिनी ८ मार्च, २०२३ ला राजस्थानमधील महिला आणि मुली रोडवेज बसमधून मोफत प्रवास करू शकणार आहेत. सरकारने जारी केलेल्या निवेदनातून ही माहिती मिळाली आहे. त्याचवेळी, राज्यातील सामान्य रोडवेज बसच्या भाड्यात महिलांना देण्यात येणारी सवलत ५० टक्के करण्यात आली आहे.
अधिकृत निवेदनानुसार मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राजस्थान राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (आरएसआरटीसी) बसेसमध्ये ही सूट कायम राहील. या प्रस्तावानुसार राजस्थानच्या हद्दीतील राजस्थान रोडवेजच्या सर्व सामान्य आणि जलद बसेसमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राज्यात सुमारे ८.५० लाख महिला आणि मुली बसमधून प्रवास करतील असा अंदाज आहे. यावर सुमारे ७.५० कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पडणार आहे. त्याचवेळी, आणखी एका निर्णयात मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्याच्या हद्दीतील आरएसआरटीसीच्या सामान्य बसमध्ये महिलांसाठी भाड्यात सवलत वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
राजस्थान रोडवेजच्या सामान्य बसेसवरील सवलत ३० टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आली आहे. ही सूट १ एप्रिल २०२३ पासून लागू होणार आहे. यासोबतच उर्वरित बसच्या श्रेणीतील महिलांसाठी ३० टक्के सवलत कायम राहणार आहे. या निर्णयामुळे राज्य सरकारवर सुमारे ३.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त वार्षिक आर्थिक बोजा पडणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी २०२३-२४ या वर्षाच्या अर्थसंकल्पात सूट वाढवण्याची घोषणा केली होती. त्या घोषणेचा संदर्भ घेऊन ही मान्यता देण्यात आली आहे.