किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजयपूर, (१२ फेब्रुवारी ) – राजस्थानमध्ये यावर्षीच्या अखेरीस विधानसभेची निवडणूक होणार आहे. अशातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी, निवडणुकीनंतरही मीच मुख्यमंत्रिपदी कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले. मुख्यमंत्रिपदाच्या तयारीत असलेले सचिन पायलट यांना एकप्रकारे गहलोत यांनी डिवचले असल्याचे बोलले जात आहे.
राजस्थान काँग्रेसमध्ये पायलट आणि गहलोत असे दोन गट आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार, पायलट यांच्यासाठी गहलोत खुर्ची रिकामी करतील का, हा महत्त्वाचा मुद्दा होता. त्याचे उत्तर गहलोत यांनी आज रविवारी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीतून दिले. आयुष्यातील अखेरच्या श्वासापर्यंत मी राजकारणातून निवृत्त होणार नाही. काँग्रेससाठी मी शेवटपर्यंत काम करणार आहे आणि आगामी विधानसभा निवडणूकही लढविणार आहे. माझ्यासह पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता काँग्रेसविना शून्य आहे. राज्यात पुन्हा काँग्रेसला सत्ता मिळाली तर मु‘यमंत्री मीच असणार आहे, असे गहलोत यांनी सांगितले.
वयाच्या २० व्या वर्षापासून मी राजकारणात आहे. माझ्याकडे प्रचंड अनुभव आहे. मी आतापर्यंत तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्रिपद भूषविले आहे. माझ्याकडे सत्तेची सूत्रे सोपविताना पक्षश्रेष्ठींनी नक्कीच काही विचार केला असावा. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि आता सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. यामागे नक्कीच काही तरी अर्थ असावा. काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक जिंकणार आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे पुन्हा माझ्याच हाती येणार, असे गहलोत म्हणाले.