किमान तापमान : 23.99° से.
कमाल तापमान : 24.74° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा,
भोपाळ, (१२ फेब्रुवारी ) – आगामी महाशिवरात्रोत्सवानिमित्त ‘शिव ज्योती अर्पण’ कार्यक्रमाचा भाग म्हणून उज्जैन शहरात १८ फेब्रुवारी रोजी २१ लाख दिवे प्रज्वलित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केली. मागील वर्षी उज्जैनमध्ये महाशिवरात्रीनिमित्त ११ लाख ७१ हजार ०७८ दिवे लावण्यात आले होते. आता २१ लाख दिवे लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवायचे आहे, असे चौहान यांनी सांगितले.
या भव्य कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शनिवारी उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. उज्जैनमध्ये येत्या १८ फेब्रुवारी रोजी अगदी दिवाळीसारखाच महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे बैठकीनंतर जारी एका निवेदनात मुख्यमंत्री चौहान यांनी म्हटले आहे. उज्जैनमधील नागरिकांनी २१ लाख दिवे लावण्याच्या कार्यक्रमात सहभागी व्हावे. नागरिक, समाज आणि सरकारच्या सहभागातूनच हा विश्वविक्रम केला जाऊ शकतो, असे चौहान यांनी यात नमूद केले. उज्जैनमधील मंदिर, व्यावसायिक ठिकाणे आणि घरांसोबतच क्षिप्रा नदीच्या किनार्यावर २१ लाख दिव्यांची आरास सजवली जाणार आहे, अशी माहिती चौहान यांनी दिली.