किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल-केरळातील घटना,
तिरुअनंतपुरम्, (०८ जुलै) – केरळमधील अलप्पुझा येथे गुरुदत्त या दहावीतील मुलाने दूषित पाण्याने केलेली आंघोळ त्याच्या जीवावर बेतली आहे. नेग्लेरिया फॉवलेरी म्हणून ओळखल्या जाणार्या अमिबामुळे त्याचा मृत्यू झाला. हा मेंदू कुरतडणारा अमिबा म्हणून ओळखळा जातो. गुरुदत्तला संसर्ग झाला होता. त्याला ताप आणि झटके येत होते. तपासणीत प्रायमरी अमिबिक मेनिंगोएन्सेफ्लायटीसचा संसर्ग आढळून आला. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी शुक‘वारी गुरुदत्तच्या मृत्यूची माहिती दिली. लोकांनी दूषित पाण्याने आंघोळ करू नये, असा इशाराही त्यांनी दिला.
अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलच्या मते, हा अमिबा माती आणि तलाव, नद्या आणि गरम पाण्याच्या झर्यांसारख्या उबदार गोड्या पाण्यात राहतो. त्याला ब्रेन इटिंग अमिबाही त्याला म्हटले जाते. अमिबा असलेले पाणी नाकात गेले की मेंदू संक्रमित होतो. हा अमिबा असलेले पाणी प्यायल्याने मात्र संसर्ग होत नाही. हा अमिबा मेंदूचे मांस खातो. प्रतिजैविकांनी तो नष्ट केला जाऊ शकतो; पण बहुतांश प्रकरणांत उपचाराला वेळ उलटलेला असल्याने रुग्ण दगावतात. ताप, डोकेदुखी, उलट्या आणि चक्कर येणे, अशी याची लक्षणे आहेत.
वैशिष्ट्ये जाणून घ्या
– हा अमिबा साचलेल्या पाण्यात राहतो
– नाकाच्या पातळ त्वचेतून आत प्रवेश करतो
– अशी घटना अपवादाने घडत असली तरी, सतर्कता महत्त्वाची आहे
– यापूर्वी १०१६ ते २०२२ दरम्यान अशी चार प्रकरणे समोर आली, पण सर्वांचा मृत्यू