किमान तापमान : 24.74° से.
कमाल तापमान : 24.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 5.97 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.99° से.
23.55°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलजम्मू, (०८ जुलै) – जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद पसरविणार्यांच्या मुसक्या आवळण्याच्या दिशेने भारतीय लष्कराने धडक पावले उचलली आहेत. सुमारे २५० अतिरेक्यांची यादी लष्करी अधिकार्यांनी तयार केली असून, यातील सर्वांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. काश्मीर खोर्यानंतर जम्मूतील दहशतवादाला आळा घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणांनी डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यांतील सुमारे २५० दहशतवाद्यांची यादी तयार केली आहे. या अतिरेक्यांवर लवकरच मोठी कारवाई केली जाणार आहे. सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये बसलेले दहशतवादी भारताविरोधात सातत्याने कट रचत आहेत. या अतिरेक्यांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे.
एकेकाळी दहशतवादाने ग्रासलेल्या जम्मू विभागातील रामबन, डोडा आणि किश्तवाड या जिल्ह्यांमध्ये सध्या शांतता आहे. यामुळे पाकिस्तान कासाविस झाला आहे. या तीन जिल्ह्यांमध्ये अशांतता पसरवण्याचा आणि येथील तरुणांना दहशतवादाच्या मार्गावर ढकलण्याचा प्रयत्न पाकिस्तान सातत्याने करीत आहे. मात्र, सुरक्षा दलांना पाकी कटाची माहिती मिळाली असून, त्यांनी या तीन जिल्ह्यांतील सुमारे २५० अतिरेक्यांची यादी तयार केली आहे, जे पाकिस्तान आणि व्याप्त काश्मीरमध्ये बसून भारताविरुद्ध कट रचत आहेत. या अतिरेक्यांच्या नावासह, त्यांच्या संपत्तीची संपूर्ण माहिती सुरक्षा यंत्रणांकडे आहे आणि लवकरच या सर्व मालमत्ता जप्त करण्याची प्रकि‘या सुरू केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
तरुणांना दहशतवादासाठी प्रवृत्त करतात
व्याप्त काश्मीरमध्ये बसलेले दहशतवादी जम्मू विभागातील तरुणांना दहशतवादी बनण्यास प्रवृत्त करतात. हे दहशतवादी पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या इशार्यावर डोडा, किश्तवाड आणि रामबनमधील आपल्या नातेवाईकांनाच नव्हे तर, येथील निष्पाप तरुणांनाही दहशतीचा मार्ग निवडण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत, असे अलिकडील तपासात उघड झाले आहे.