किमान तापमान : 27.87° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : overcast clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 3.54 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.87°से. - 30.57°से.
शुक्रवार, 15 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.82°से. - 30.41°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.75°से. - 30.46°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.9°से. - 31.02°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर साफ आकाश27.09°से. - 30.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.49°से. - 30.08°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश– दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा राजस्थानचे उपमुख्यमंत्री,
जयपूर, (१२ डिसेंबर) – राजस्थानमध्ये विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली असून, भजन लाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. राजस्थानमध्ये भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष, भजन लाल शर्मा पहिल्यांदाच निवडणूक जिंकत आमदार झाले आहेत. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशप्रमाणेच मुख्यमंत्र्यांच्या नावाच्या घोषणेसोबतच राजस्थानमध्येही दोन उपमुख्यमंत्र्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.
छत्तीसगड आणि मध्य प्रदेशनंतर आता राजस्थानमध्येही नव्या चेहर्याला मुख्यमंत्री करण्यात आले आहे. भजनलाल शर्मा यांच्याकडे राजस्थानची कमान सोपवण्यात आली आहे. आधीच भाकित केल्याप्रमाणे राजस्थानमध्येही तेच दिसून आले आहे. भरतपूर येथील रहिवासी असलेले भजनलाल शर्मा हे दीर्घकाळापासून संस्थेत कार्यरत आहेत. तसेच ते प्रदेश सरचिटणीस म्हणून कार्यरत आहेत. जयपूरच्या सांगानेरसारख्या सुरक्षित जागेवरून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आहे. आमदार अशोक लाहोटी यांना तिकीट न देता, भजनलाल शर्मा यांना उमेदवारी दिली होती. यामध्ये भजनलाल शर्मा विजयी झाले. पक्ष्याच्या महत्त्वाच्या भूमिकेसाठी त्यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.
विधिमंडळ पक्षाच्या बैठकीपूर्वी जयपूरला पोहोचलेल्या तीन निरीक्षकांसोबत भाजप आमदारांचे फोटो सेशन झाले. फोटो सेशनदरम्यान मुख्य निरीक्षक राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे उपस्थित होते. विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू होण्यापूर्वी पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांनी राजनाथ सिंह, विनोद तावडे आणि सरोज पांडे यांच्याशी फोनवर चर्चा केली. आमदारांशी बोलूनच मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. भजन लाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे.