किमान तापमान : 23.81° से.
कमाल तापमान : 23.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 50 %
वायू वेग : 4.88 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.99° से.
23.71°से. - 24.88°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.37°से. - 25.6°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.45°से. - 26.84°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.9°से. - 25.67°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.94°से. - 25.02°से.
गुरुवार, 16 जानेवारी घनघोर बादल23.69°से. - 26.74°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादल– हात-पायात कडा, कमरेला कमरपट्टा, नखापासून कपाळापर्यंत रत्नजडित,
– अनुष्ठानाचे पूर्णत्व म्हणून पंतप्रधानांनी रामललांना चांदीचे छत्र अर्पण केले,
अयोध्या, (२२ जानेवारी) – रामललाची प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली आहे. प्रभू श्री राम सिंहासनावर विराजमान झाले आहेत. सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या रामललाला पाच वर्षांच्या बालरूपात पाहून लोक भावूक झाले. २०० किलो वजनाच्या या मूर्तीला ५ किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. प्रभू त्यांच्या नखापासून कपाळापर्यंत रत्नजडित आहेत.
रामललाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. त्याच्या काठाला मोत्यांची झालर लटकलेली आहे. कपाळाच्या मध्यभागी पांढर्या धातूपासून बनवलेला टिळा आहे. कानात सोन्याचे झुमके घातले. गळ्यात हिरव्या, पांढ्या आणि लाल रंगाच्या मोत्यांची दिव्य माळ आहे. त्याचे लटकन रामललाच्या नाभीपर्यंत लटकलेले आहे. दोन्ही हात आणि पायात सोन्याच्या कडा आहेत. उजव्या हातात सोन्याचा बाण आणि डाव्या हातात धनुष्य आहे. उजव्या हाताच्या अंगठ्यावर अंगठी आहे. त्यात एक माळ लटकलेली आहे. शिवाय, देवाने एक मोठा हार धारण केला आहे. ही माळ सोन्याच्या रंगासारखी जी मानेपासून पायापर्यंत लटकलेली आहे. त्याचे वजन सुमारे दोन किलो असल्याचे सांगितले जाते. रामललाने पिवळ्या रंगाची चुनरी ओढलेली आहे. धोतराचा रंगही पिवळा आहे.
पंतप्रधानांकडून चांदीचे छत्र अर्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलला प्राणप्रतिष्ठेसाठी ११ दिवसांचे अनुष्ठान केले होते. यात उपवासासोबत काही नियमांचेही कठोर पालन अपेक्षित होते. या अनुष्ठानाचे पूर्णत्व म्हणून पंतप्रधानांनी रामललांना चांदीचे छत्र अर्पण केले. मंदिराकडे अनवाणी जात असताना त्यांनी हातात रामललांसाठीचे छत्र हाती घेतले होते.