किमान तापमान : 29.17° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर घनघोर बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशअयोध्या, (२२ जानेवारी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यम नियमांचे कठोर पालन ज्या पद्धतीने केले, ते आम्हा सर्व धार्मिक नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाही जास्त असल्याचे कौतुकोद्गार श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी काढले.
अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ दिवसांचे अनुष्ठान केले. त्यात उपवास आणि कठोर तपाचरण अभिप्रेत असते. मात्र, इतक्या मोठ्या पदावर असूनही पंतप्रधानांनी संन्यासीजनांच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रभावीपणे हे अनुष्ठान केले. आम्ही काही महापुरुषांशी चर्चा केल्यानंतर लिहिले होते की पंतप्रधानांनी केवळ तीन दिवसांचा उपवास करायचा आहे. मात्र, त्यांनी संपूर्ण अकरा दिवसांचे व्रत केले. मी स्वत: फार तार्किक आहे. फार पूर्वी पंतप्रधानांच्या मातोश्रींची भेट घेऊन ते करीत असलेल्या उपवासांविषयीची खात्री करून घेतली होती. त्यांनी दाखविलेली आध्यात्मिक प्रतिबद्धता वाखाणण्यासारखी आहे, असेही स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज म्हणाले.
एखादा राष्ट्रीय नेता होणे ही सामान्य बाब नाही. काही दिवसांमध्ये आम्ही म्हटले होते की, तुम्ही विदेश प्रवास करू नका, कारण त्यात येता-जाताना अनेक विघ्न येण्याची शक्यता आहे. तेव्हा तुम्ही विदेश प्रवास टाळला. हे केवळ देशभक्तीमुळेच शक्य झाले. अनुष्ठानाच्या काळात तुम्ही केवळ देशात प्रवास केला. जो नाशिकपासून सुरू करीत रामेश्वरपर्यंत होता, असेही गोविंद देव गिरीजी महाराज यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून म्हणताच मोदी भावूक झाले. विशेष म्हणजे, प्राणप्रतिष्ठेनंतर स्वत: स्वामीजींनी त्यांचा उपवास सोडण्यास श्रीरामांचे चरणतीर्थ पंतप्रधानांना दिले.
शिवाजी महाराजांचे होतेय् स्मरण
अनुष्ठानाच्या काळातही पंतप्रधान मोदी देशाच्या कानाकोपर्यात जाऊन निमंत्रण देत होते की, सर्व दिव्य आत्म्यांनो, तुम्ही अयोध्येत या आणि आमच्या देशाच्या महान बनण्यासाठी आशीर्वाद द्या. या काळात ते जमिनीवर झोपत होते. तीन दिवसच त्यांनी भूमिशयन करणे अपेक्षित असताना ते सलग ११ दिवस जमिनीवर झोपले. इतक्या थंडीत अशा प्रकारे भूमिशयन करणे म्हणजे तुमच्यावर साक्षात ब्रह्मदेवांचा अशीर्वाद असावा. भारतीय संस्कृतीचा सर्वांत मूळ शब्द आहे ‘गुरुदेव’. या सर्व वैशिष्ट्यांना पाहून केवळ एका राजाचे स्मरण होते, ज्याच्यामध्ये ही सर्व वैशिष्ट्ये होती आणि तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, अशा शब्दांत गोविंद देव गिरी यांनी मोदींचे कौतुक केले.