किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलअयोध्या, (२२ जानेवारी) – अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर रामलला अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान झाले. नागर शैलीत बांधलेले अयोध्येतील श्रीराम मंदिर अतिशय भव्य-दिव्य आहे. गेल्या दोन वर्षांपासून या मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू होते. यासाठी देशासह जगभरातून देणग्या आल्या होत्या. या भव्य मंदिराच्या उभारणीसाठी १८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्यापैकी ११०० कोटी रुपये खर्च झाले आहेत. सर्वसामान्यांपासून ते मोठ्या उद्योगपतींनी सुमारे ३२०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे.
राम मंदिराच्या उभारणीसाठी देशभरातील कोट्यवधी सेलिब्रिटींनी, उद्योगपतींनी, साधू-संतांनी देणग्या दिल्या आहेत. सुरतमधील हिरे व्यापारी दिलीपकुमार व्ही. लाखी यांनी राम मंदिरासाठी १०१ किलो सोने (सुमारे ६८ कोटी रुपये) दान केले आहे. राम मंदिरासाठी दुसरी सर्वांत मोठी देणगी कथाकार आणि आध्यात्मिक गुरू मोरारी बापू यांनी दिली आहे. मोरारी बापू यांनी मंदिराच्या बांधकामासाठी श्री रामजन्मभूमी ट्रस्टला १८.६ कोटी रुपयांची देणगी दिली. मोरारी बापूंनी ही रक्कम लोकवर्गणीतून जमा केली. यापैकी त्यांनी भारतातून ११.३० कोटी रुपये, ब्रिटन आणि युरोपमधून ३.२१ कोटी रुपये आणि अमेरिका, कॅनडामधून ४.१० कोटी रुपये जमा केले. मंदिराच्या उभारणीसाठी लोकांनी देणगी द्यावी, असे आवाहन ते आपल्या रामकथेमध्ये करायचे.
अयोध्येसाठी उद्योगपतींनी तिजोरी उघडली
डाबर इंडियाने राम मंदिर अभिषेक प्रसंगी जाहीर केले आहे की, ते १७ ते ३१ जानेवारी या कालावधीत त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील काही भाग श्री जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला दान करणार आहेत. आयटीसी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राशी संबंधित असून, ते उद्घाटनाच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत धूप दान करणार आहेत. हॅवेल्सने राममंदिर उजळून टाकण्यासाठी योगदान दिले. याशिवाय, इतर अनेक उद्योगपतींनी राम मंदिरासाठी भरभरून दान केले आहे.