किमान तापमान : 30.33° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.01 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशरामचरित्र मानसच्या मुद्यावरही भाष्य,
नवी दिल्ली, (५ फेब्रुवारी ) – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली नकारात्मक प्रतिमा सोडल्यास त्यांच्या पक्षाला फायदा होईल, असा सल्ला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला. यावेळी त्यांनी रामचरित्र मानसच्या मुद्यावरही भाष्य केले. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या राज्यातील विकासाची बाजू मांडली तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरही भाष्य केले.
देशात जातीच्या आणि समाजाच्या नावावर प्रादेशिक क्षेत्र तसेच भाषेच्या आधारावर काँग्रेसच्या काळात फाळणी झाली. त्यांना जे वारसा हक्काने मिळाले, ते देशाला परत करत आहे. राहुल गांधी यांनी आपली नकारात्मक प्रतिमा सोडल्यास काँग्रेसला फायदा होईल. परंतु, तसे न करता आपल्याच प्रयत्नांवर पाणी फेरत आहेत. कोणत्या कार्यक्रमातील गर्दीचा अर्थ लोकांचा पाठिंबा मिळाला, असे कधीही नसते. सर्व सामान्यांवर त्या कार्यक्रमाचा कसा आणि किती फरक पडला, ही बाब महत्त्वाची आहे. प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. देशाला त्याचा हेतू सुद्धा माहिती असावा, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले.
रामचरित्र लोकांना जोडणारे
रामचरित्र मानस पवित्र ग्रंथ असून, उत्तर भारतातील प्रत्येक घरातील मंगलकार्यात पठन करण्यात येते. काही लोकांना रामचरित्र मानसची माहिती असती तर, त्यांनी यावर आक्षेप घेतला नसता, असेही आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमात त्यानी फाळणीचा मुद्दा उपस्थित केला. उत्तरप्रदेशातील जनतेने विभाजन करणार्या लोकांना कायम फटकारले आहे. मतदारांनी त्यांना २०१४, २०१९ मध्ये नाकारले असून, पुढील काळातही हीच स्थिती दिसून येईल, असे मुख्यमंत्री आदित्यनाथ म्हणाले.