किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलनांदेड, (५ फेब्रुवारी ) – तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव रविवारी नांदेडच्या हिंगोली गेट परिसरातील मैदानावर आपल्या पहिल्या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री केसीआर यांनी आपल्या पक्षाचा देशभरात विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारीतच नांदेडमध्ये बैठक होणार होती. परंतु, शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे सभा तहकूब करावी लागली. त्यानंतर ५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित करण्यात आली.
या सभेच्या तयारीसाठी तेलंगणाचे मंत्री, खासदार आणि आमदार पंधरा दिवसांपासून तळ ठोकून आहेत. हिंगोली गेटच्या मैदानात सुमारे २० हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील अनेक लोक बीआरएसमध्ये सहभागी होणार आहेत. तेलंगणातील भारत राष्ट्र समिती या पक्षाने आता महाराष्ट्राच्या राजकारणात आपली मुळे रोवण्यास सुरुवात केली आहे. याची सुरुवात ५ फेब्रुवारी रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाभळीच्या पाण्याच्या प्रश्नावर महाराष्ट्रातील नेत्यांवर आरोप करून बीआरएस पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणात श्री गणेशा करणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील मराठी माणसांच्या समस्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना जबाबदार धरून या गावातील समस्या समोर आणून ही बैठक आयोजित केली जाणार आहे.