किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 31° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 60 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31° से.
27.43°से. - 31.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश-आसाम सरकारकडून ३.२२ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर,
गुवाहाटी, (१६ मार्च) – आसाम सरकारने २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी आज गुरुवारी ३.२२ लाख कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला. लघुउद्योजकतेला चालना देण्यासाठी आणि विविध विभागांमध्ये नवीन नियुक्त्या करण्यासाठी अर्थसंकल्पात निधीची घोषणा करण्यात आली आहे. विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री अजंथा निओग म्हणाले की, दोन लाखांहून अधिक बेरोजगार तरुणांना रोजगार निर्मितीमध्ये रूपांतरित करण्यासाठी राज्य सरकार ५,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
राज्याचे सकल देशांतर्गत उत्पादन पुढील आर्थिक वर्षात ५.५ लाख कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे, जो २०२१-२२ मध्ये ३.९३ लाख कोटी रुपये होता. २०२३-२४ मध्ये एकूण प्राप्ती ३,२१,७४२.७१ कोटी रुपये आणि एकूण खर्च ३,२१,०८१.७५ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. अशा प्रकारे, एकूण सरप्लस ६६०.९६ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
१,५९६.१९ कोटी रुपयांच्या प्रारंभिक तुटीसह एकत्रितपणे, २०२३-२४ च्या अखेरीस ९३५.२३ कोटी रुपयांची बजेट तूट होणार आहे. हिमंता विश्व शर्मा यांच्या नेतृत्वाखालील सरकार १० मे रोजी दोन वर्षे पूर्ण करेल, तोपर्यंत ४०,००० तरुणांची विविध विभागांमध्ये भरती केली जाईल, जे एक लाख सरकारी नोकर्या देण्याच्या भाजपच्या निवडणूक आश्वासनाच्या अनुषंगाने एक पाऊल आहे.