किमान तापमान : 30.79° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 0.89 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.34°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.73°से. - 29.67°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.66°से. - 30.59°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.36°से. - 31.64°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.5°से. - 30.53°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.69°से. - 30.56°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, (१६ मार्च) – भारत राष्ट्र समितीचे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कविता यांना पुन्हा समन्स बजावले आहे. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आता कविताला २० मार्चला हजर राहण्यास सांगितले आहे. कविता आज ईडीसमोर हजर होणार होती, पण तिने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित याचिकेचा हवाला देत हजर राहण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेत कविता यांनी ईडीने जारी केलेल्या समन्सला आव्हान देत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी केली आहे.
तेलंगणा विधान परिषदेचे सदस्य आणि राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता हिने तिचा अधिकृत प्रतिनिधी (बीआरएसचा पदाधिकारी) पाठवला. ज्याने तिच्या व्यवहारांचा, बँक स्टेटमेंटचा, वैयक्तिक आणि व्यावसायिक तपशीलांचा सहा पानांचा अहवाल प्रकरणाच्या तपास अधिकार्याला दिला. या प्रकरणातील ईडीच्या समन्सला आव्हान देणार्या आणि अटकेपासून संरक्षण मागणार्या कविताच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी २४ मार्च रोजी सुनावणी घेण्याचे मान्य केले.
या प्रकरणी कविता (४४) यांची ११ मार्च रोजी प्रथम चौकशी करण्यात आली, त्यानंतर तिला १६ मार्च रोजी पुन्हा हजर राहण्यास सांगण्यात आले. ईडीला पाठवलेल्या पत्रात कविताने म्हटले आहे की, समन्समध्ये तिला वैयक्तिकरित्या हजर राहण्याची गरज असल्याचे म्हटले नव्हते. मी तुम्हाला नम्रपणे विनंती करतो कीच् सर्वोच्च न्यायालयासमोर कार्यवाही प्रलंबित आहे, त्यामुळे समन्सबाबत कोणतीही कारवाई करण्यापूर्वी त्यांच्या निर्देशांची प्रतीक्षा करावी, असे त्यांनी सांगतले.