किमान तापमान : 29.03° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.31 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.43°से. - 30.99°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.11°से. - 29.65°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल28.11°से. - 30.16°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.62°से. - 31.24°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश27.06°से. - 30.11°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.3°से. - 30.22°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशपंजाब नॅशनल बँकेतील घटना,
उदयपूर, (११ फेब्रुवारी ) – माणसं पैसा खातात हे तर सर्वमान्यच आहे पण, उधईच्या किड्यांनाही पैसा खायला आवडतो, हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेवरून दिसून आले आहे. उदयपूरच्या पंजाब नॅशनल बँकेत असलेल्या लॉकरमध्ये एका महिला ग्राहकाने ठेवलेली रोख रक्कम उधईने फस्त केल्याची घटना उघडकीस आली. लॉकर क्रमांक २६५ मध्ये या महिलेने तब्बल सव्वा दोन लाख रुपये रोख ठेवली होती. गेल्या वर्षीच्या मे महिन्यात तिने हे लॉकर उघडून पैशांचा अंदाज घेतला होता. त्यानंतर, थेट गेल्या आठवड्यात तिने लॉकर उघडले. पैशांची गरज असल्यामुळे पैसे काढण्यासाठी आलेली ही महिला, लॉकर उघडून बघताच चक्रावून गेली. तिने ठेवलेल्या रोख नोटांच्या गड्ड्यांचा उधईने फडशा पाडला होता. चकीत आणि गोंधळलेल्या अवस्थेत तिने बँक अधिकार्यांकडे धाव घेतली.
झाल्या प्रकाराविषयी आपल्याला काही कल्पना नसल्याचे वरवर स्पष्टीकरण देत, कर्मचार्यांनी आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. बँक व्यवस्थापनाने पेस्ट कंट्रोल किंवा तत्सम उपाययोजना न केल्यामुळे हा प्रकार घडला असावा. केवळ रोख रक्कमच नाही तर महत्त्वाची कागदपत्रे, जमिनीचे दस्तावेज इत्यादी साहीत्यदेखील सामान्यपणे बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले जाते. तेदेखील असेच मातीमोल झाले असल्याची भिती वर्तविण्यात येत आहे. बँकेतील आणखी किमान २५ लॉकर्सना अशीच उधई लागलेली असण्याची शक्यता आहे. बँक कर्मचार्यांनी या समस्येकडे वेळीच लक्ष दिले असते तर, लोखंडी लॉकरपर्यंत उधई पोहचली नसती. दरम्यान, या प्रकाराची माहिती बँकेच्या वरिष्ठ अधिकार्यांना देण्यात आली असून, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी काय करता येईल? यावर विचारमंथन सुरू आहे. मात्र, हा प्रकार धक्कादायक आणि मनस्ताप देणारा आहे, हे नक्की!