किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलअलाहाबाद उच्च न्यायालयाचे निरीक्षण,
नवी दिल्ली, ३ ऑगस्ट – केवळ विवाहासाठी धर्मपरिवर्तन करणे चुकीचे आहे, असे निरीक्षण अलाहाबाद उच्च न्यायालयाने नोंदविले असून, या वेळी जोधा-अकबरचे उदाहरणही दिले आहे.
एका सुनावणीत उच्च न्यायालयाने जोधा-अकबरच्या विवाहाचे उदाहरण देऊन धर्मपरिवर्तनापासून दूर राहा, असा सल्ला दिला. अकबर आणि जोधाबाई यांच्या विवाहाचे उदाहरण सर्वांनी डोळ्यासमोर ठेवून धर्मपरिवर्तनासारख्या अनावश्यक घटनांपासून दूर राहण गरजेचे आहे, असे उच्च न्यायालयाने सांगितले.
अकबर आणि जोधाबाईने धर्मपरिवर्तन न करताच विवाह केला होता तसेच परस्परांचा सन्मान आणि धार्मिक भावनांचा आदरही केला होता. दोघांच्याही नात्यात धर्मचा अडथळा नव्हता, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले.
उत्तरप्रदेशातील एटाह जिल्ह्यातील जावेद नावाच्या व्यक्तीने जामिनासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने उपरोक्त निरीक्षण नोंदवले आहे. धर्म हा आस्थेचा विषय असून, या माध्यमातून आपली जीवनशैली दिसून येते, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
ईश्वराप्रती आस्था दर्शवण्यासाठी कोणतीही विशिष्ट पूजा पद्धत असणे गरजेते नाही. विवाहासाठी समान धर्म असावा, असेही गरजेचे नाही. त्यामुळे केवळ विवाह करण्यासाठी धर्मपरिवर्तन करणे पूर्णतः चुकीचे आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
अशा धर्मपरिवर्तनांमध्ये धर्माबाबत कोणतीही आस्था नसते. हा निर्णय नेहमी दबाव, भीती किंवा आमिषामुळे घेतला जातो. केवळ विवाहासाठी केले जाणारे धर्मपरिवर्तन चुकचे आहे. याला घटनात्मक मान्यता नाही, असे न्यायालयाने जावेद प्रकरणी निर्णय देताना सांगितले. वैयक्तिक फायद्यासाठी करण्यात आलेल्या धर्मपरिवर्तनामुळे केवळ वैयक्तिक पातळीवर नुकसान होत नाही, तर देश आणि समाजासाठी हे अत्यंत घातक आहे. अशा प्रकारच्या धर्मपरिवर्तनामुळे धर्माच्या ठेकेदारांना आणि फुटीरतावादी शक्तींना बळ मिळते, असे कठोर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदविले.
एटाहा जिल्ह्यातील जावेद नावाच्या मुलाने हिंदू मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचा धर्म बदलण्यासाठी बळजबरीने एका दस्तावेजांवर तिच्या स्वाक्षर्या घेतल्या. धर्म बदलल्यानंतर एक आठवड्याने लग्न केले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे बयाण त्या मुलीने न्यायाधीशांना दिले. त्या आधारे जावेदला अटक करण्यात आली. जावेदचा जामीन अर्ज याच तथ्यांच्या आधारे फेटाळण्यात आला आहे.