किमान तापमान : 24.02° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.02° से.
23.64°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.63°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलआपत्ती निवारण दलाकडून बचावकार्य,
भोपाळ, ४ ऑगस्ट – मागील काही दिवसांपासून मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर-चंबल भागात मुसळधार पावसामुळे जवळपास १,१७७ गावांना पुराचा फटका बसला आहे. २०० गावांना सर्वाधिक धोका झाला. शिवपुरी आणि श्योपूर जिल्ह्यात पूरस्थिती अधिकच बिकट झाली असून, नागरिकांसह पाळीव प्राणी आणि वन्यजीवांची सुरक्षित सुटका करण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे जवान जोरदार प्रयत्न करत आहेत.
मुसळधार पावसाने शिवपुरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले. याठिकाणी मागील काही तासांत ८०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. (२६ जुलै २००५ रोजी मुंबईत ९४४ मिलीमीटर पाऊस कोसळला होता.) जवळपास २०० पेक्षा अधिक गावांना पुराचा वेढा आहे. प्रशासनाचे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून, राज्य आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल यांच्यासह भारतीय लष्कर सुद्धा बचावकार्य करत आहे. यात एसडीआरएफचे सात पथक तैनात असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. मंत्रिमंडळातील दोन मंत्री शिवपुरीमधील नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. याशिवाय भारतीय लष्कराकडे चार कॉलमची मागणी (एका कॉलममध्ये ८० जवान सहभागी असतात.) करण्यात आली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या संदर्भात माहिती दिली.
गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चा
मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना राज्यातील पूर परिस्थितीची माहिती दिली. यावर शाह यांनी केंद्र सरकारकडून मध्यप्रदेशाला सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले. पुराच्या कठीण स्थितीत मोदी सरकार राज्यातील जनतेमागे ठाम उभे असल्याचेही गृहमंत्री शाह यांनी टि्वटद्वारे सांगितले.