किमान तापमान : 27.71° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 4.28 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
27.79°से. - 30.66°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.54°से. - 30.53°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.6°से. - 29.96°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.44°से. - 30.51°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.94°से. - 29.99°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.27°से. - 30.16°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश– संदेशखालीत जमीन बळकावण्याच्या प्रकरणात कारवाई,
कोलकाता, (२३ फेब्रुवारी) – पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखाली येथील आदिवासी नागरिकांची जमीन बळजबरीने बळकावून महिलांवर अत्याचार प्रकरणातील पसार झालेला मुख्य आरोपी तृणमूल काँग्रेसचा नेता शाजहान शेखच्या निकटवर्तींय व्यावसायिकांच्या घर व कार्यालयांवर शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने छापे टाकले. हावडा, बिजोयगड व बिराती भागात करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान ईडीच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले होते.
शाजहानचा २४ परगणा जिल्ह्यासह हावडा परिसरात मत्सोपालन व्यवसाय आहे. त्याची अनेक व्यावसायिकांशी जवळीक आहे. त्यांच्यासोबत अनेक व्यवसायात शाजहानची भागीदारी असल्याची माहिती आहे. जमीन बळकावण्याच्या प्रकरणात या व्यावसायिकांचा सुध्दा समावेश असल्याचा संशय असल्याने ईडीने शुक्रवारी सकाळी चार ठिकाणी छापे टाकले. यातील २४ परगणा जिल्ह्यच्या बिराती येथील अरुण सेनगुप्ता व बिजोयगड येथील अरुण शोम यांच्या घरी टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये जमिनीच्या संबंधित दस्तावेज आढळून आल्याचे ईडीच्या अधिकार्याने सांगितले. दोघेही आयात-निर्यात व्यवसायात शाजहानसोबत काम करतात. ईडीने जमीन बळकावण्याच्या प्रकरणात यापूर्वीच गुन्हा दाखल केला आहे.
मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी घेतली पीडितांची भेट
संघर्षग्रस्त संदेशखाली गावाला शुक्रवारी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्यांनी भेट दिली. रस्ता नसल्याने कलागाची नदीतून नावेने प्रवास करून आयोगाचे सदस्य गावात पोहोचले. त्यांनी पीडित महिलांसह ज्या नागरिकांची जमीन शाजहान व त्याच्या साथीदारांनी बळकावली, त्यांची आस्थेने चौकशी केली तसेच या प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन झाले का, याची शहानिशा केली. यावेळी त्यांनी पीडित महिलांचे जबाब नोंदवून घेतले.
हातात लाठी, झाडू घेऊन महिलांचे आंदोलन
बळजबरीने जमीन बळकावण्याचा व महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपातील मुख्य आरोपी शाजहान व त्याचा भाऊ सिराजला तत्काळ अटक करण्याच्या मागणाीसाठी शुक्रवारी संदेशखाली गावातील महिलांनी हातात लाठी व झाडू घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी पोलिसांच्या असक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आरोप केला की, वर्षभरापासून शाजहान व त्याच्या साथीदारांकडून अमानूष अत्याचार केला जात होता. मात्र, पोलिसांनी तक्रारीची दखल घेतली नाही.
भाजपा महिला मोर्चाला रोखले
अत्याचार पीडित महिलांना भेटण्यासाठी भाजपा महिला मोर्चाचे ६ सदस्यीय प्रतिनिधीमंडळ जात असताना त्यांना संदेशाखाली गावाच्या सीमेवरच पोलिसांनी रोखले. संदेशखालीमध्ये कलम १४४ लागू असल्याचा दाखला देत त्यांना पीडितांची भेट घेण्यापासून मज्जाव करण्यात आला. खासदार लॉकेट चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेत हे प्रतिनिधीमंडळ पीडित महिलांना भेट देण्यासाठी जात होते. यावेळी भाजपा महिला मोर्चाच्या सदस्यांना पोलिसांनी धक्कीबुक्की केली. खासदार चॅटर्जी यांनी ममता सरकारवर गुन्हेगारांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला.