किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादल– दीक्षू कुकरेजांवर विकासाची जबाबदारी,
– ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व कायम,
अयोध्या, (२४ जानेवारी) – पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व लाभलेली आणि रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेली अयोध्यानगरी आता आधुनिक होणार आहे. दोन दिवसांपूर्वी रामललाची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते थाटात झाली. त्यानंतर भक्तांनी येथे रामललाच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली आहे.
आता उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येच्या विकासाची जबाबदारी प्रसिद्ध वास्तुविशारद दीक्षू कुकरेजा यांच्यावर सोपवली आहे. कुकरेजा यांनी नवी दिल्लीत जी-२० परिषदेसाठी भारत मंडपम् आणि यशोभूमी कन्व्हेंशन सेंटर तयार केले होते. अयोध्येचे सौंदर्यीकरण आणि आधुनिकीकरण करत असताना या नगरीचे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावे याकडे विशेष लक्ष देण्यात येत असून शरयूचे घाटही विकसित केले जाणार आहेत. रस्त्यांचे रुंदीकरण नियोजनबद्ध पद्धतीने केले जाणार आहे. त्याचे काही काम रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या आधीच पूर्ण झाले असून उर्वरित काम सोहळा पूर्ण होताच नव्या दमाने सुरू करण्यात आले आहे.
नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध दीक्षू कुकरेजा
दीक्षू कुकरेजा प्रसिद्ध वास्तुविशारद असून, सीपी कुकरेजा आर्किटेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. सीपी कुकरेजा ही देशातील सर्वोत्तम आर्किटेक्ट कंपनी आहे. त्यांचे काम प्रासंगिकता आणि नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानासह शाश्वत दृष्टिकोनासाठी ओळखले जाते.