किमान तापमान : 28.5° से.
कमाल तापमान : 28.83° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 64 %
वायू वेग : 2.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.83° से.
27.34°से. - 30.71°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.15°से. - 29.76°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.65°से. - 30.93°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर घनघोर बादल27.1°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.59°से. - 30.7°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.71°से. - 30.37°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशतुएनसांग, (२१ फेब्रुवारी ) – नागा शांतता करारासाठी चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सुरू केलेल्या कामाला लवकरच फळ मिळेल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर सभेत सांगितले. संपूर्ण ईशान्य भारतातून लवकरच अफस्फा (एएफएसपीए) कायदा हटवला जाईल, अशी आशा आहे, असेही गृहमंत्र्यांनी सांगितले. ईशान्येकडील राज्यांमध्ये अफस्फाकायदा हटवण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे आणि हा एक मोठा राजकीय मुद्दा आहे.
नागालँडच्या तुएनसांग भागात आज मंगळवारी एका जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले की, पूर्व नागालँडमध्ये विकासाशी संबंधित काही समस्या आहेत, ज्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर सोडवल्या जातील. नागा शांतता करारावर चर्चा सुरू आहे आणि पंतप्रधान मोदींनी घेतलेल्या पुढाकाराने ईशान्येत शांतता प्रस्थापित होऊ शकेल, अशी आशा आहे. भाजपच्या राजवटीत हिंसाचाराच्या घटना ७० टक्क्यांनी कमी झाल्या आहेत, असे ईशान्येतील दहशतवादाच्या मुद्द्यावर बोलताना अमित शाह म्हणाले.
ईशान्येकडील राज्यांमध्ये सुरक्षा दलांच्या मृत्यूच्या संख्येत ६० टक्के घट झाली आहे. त्याचवेळी सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये ८३ टक्के घट झाली आहे. अमित शाह म्हणाले की, भाजप सरकारने नागालँडच्या मोठ्या भागातून अफस्फा हटवला आहे. येत्या तीन ते चार वर्षात संपूर्ण उत्तर भारतातून अफस्फा मागे घेतला जाईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. नागालँड विधानसभेच्या निवडणुका २७ फेब्रुवारीला होणार आहेत. आणि निवडणुकीचा निकाल २ मार्चला जाहीर होणार आहे.