किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 29.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.69° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलप्रियांका वढेरांची भाजपावर टीका,
गोरखपूर, ३१ ऑक्टोबर – कॉंग्रेसने देशात मागील सत्तर वर्षांत प्रचंड विकास कामे केलीत. रेल्वे, विमानतळ सारे काही उभारले. अनेक उद्योग मोठे केले. पण, भाजपा सरकारने सर्व संपत्ती विकून टाकली. कॉंग्रेसची सत्तर वर्षांची मेहनत सात वर्षांत वाया घालवली, अशी टीका प्रियांका वढेरा यांनी केली.
प्रियांका यांनी गोरखपूर येथे रविवारी जाहीर सभा घेतली. यावेळी त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसने विकासाची असंख्य कामे केली. सत्तर वर्षांत देशाचा विकास केला. अनेक कारखाने उभारले. कॉंग्रेसने उभारलेले साखर कारखाने सपा, बसपा आणि भाजपा सरकारने बंद केले. सत्तर वर्षे कॉंग्रेसने झटून जे काही उभे केले, ते सर्व सात वर्षांत या सरकारने वाया घालवले.
उत्तरप्रदेशात जेव्हापासून योगी मुख्यमंत्री बनले आहेत ते लोकांच्या समस्या ऐकूनच घेत नाहीत. लोक बोलत राहतात आणि ते विमानात निघून जातात. गोरखपूरमध्ये साचलेले पाणी त्यांना दिसत नाही. ज्यांचा रोजगार हिरावला, त्यांना सरकारने कोणतीही मदत केलेली नाही. मात्र, कॉंग्रेसचे सरकार सत्तेत आले तर, अशा कुटुंबांना २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. साधी चप्पल घालणार्यांना विमानात बसण्याची स्वप्ने दाखविण्यात आली. पण, प्रत्यक्षात पेट्रोल-डिझेलचे दर इतके वाढले आहेत की दुचाकीवाल्यांना पायी फिरण्याची वेळ आली आहे, असेही प्रियांका म्हणाल्या.
इंदिराजींना हत्येची कल्पना होती
इंदिरा गांधी यांनी देशासाठी भरपूर कार्य केले. आपली हत्या होणार याची कदाचित त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळेच ज्या दिवशी त्यांची हत्या होणार होती, त्या दिवशी मी आणि माझा भाऊ शाळेत जात असताना त्यांनी आम्हाला जवळ घेतले. त्यांनी माझ्या भावाला सांगितले की, मला काहीही झाले तरी रडायचे नाही. त्यांना आपल्या हत्येची कल्पना असूनही त्या मागे हटल्या नाहीत. जनतेच्या विश्वासासाठी त्या ठामपणे उभ्या राहिल्या. मी तुमच्यासमोर उभी आहे ही त्यांचीच शिकवण आहे, असेही प्रियांका म्हणाल्या.