किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी– स्टॅलिन सरकारचा निर्णय,
चेन्नई, (१५ जून) – तामिळनाडूचे ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या स्टॅलिन सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीबीआयला दिलेली संमती काढून घेण्यात आली आहे. आता सीबीआयला राज्यात कोणत्याही प्रकरण्याचा तपास करायचा असेल तर, सर्वांत आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. तामिळनाडूच्या गृहविभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, तामिळनाडू सरकारने सीबीआयला दिलेली सर्वसाधारण संमती मागे घेतली आहे.
सीबीआयला यापुढे राज्यातील नवीन प्रकरणाचा तपास करण्यासाठी तामिळनाडू सरकारची परवानगी घ्यावी लागेल. पश्चिम बंगाल, राजस्थान, केरळ, मिझोरम, पंजाब आणि तेलंगणामध्ये असाच निर्णय यापूर्वीच घेतला गेला आहे. केंद्रातील भाजपा सरकारवर सत्ताधारी द्रमुककडून टीका होत असताना सरकारने हे पाऊल उचलले आहे. द्रमुकने यापूर्वीही केंद्रातील भाजपा सरकारवर टीका करताना म्हटले होते की, ( केंद्र सरकार विरोधी नेत्यांना गप्प करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करीत आहे.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार असताना अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घेण्याचा निर्णय एकमताने पारित करण्यात आला होता. मात्र, महाविकास आघाडी सरकार कोसळल्यावर सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने हा निर्णय मागे घेतला.