किमान तापमान : 22.99° से.
कमाल तापमान : 24.08° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 56 %
वायू वेग : 5.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
22.99° से.
22.99°से. - 26.39°से.
गुरुवार, 23 जानेवारी छितरे हुए बादल23.37°से. - 26.92°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
सोमवार, 27 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
मंगळवार, 28 जानेवारी टूटे हुए बादलममता बॅनर्जींना आणखी एक धक्का,
कोलकाता, १६ डिसेंबर – पश्चिम बंगालमध्ये विशेष प्रस्थ असलेले तृणमूल कॉंगे्रसचे वरिष्ठ नेते सुवेंदू अधिकारी यांनी आज बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला. अलीकडेच त्यांनी मंत्रिपदही सोडले होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.
अधिकारी आता लवकरच तृणमूल कॉंगे्रसचाही राजीनामा देण्याची शक्यता असून, असे झाल्यास पश्चिम मिदनापूर आणि लगतच्या आदिवासी भागांमधील किमान ४० जागांवर परिणाम होणार आहे. अर्थात या सर्व जागा तृणमूलला मुकाव्या लागण्याची शक्यता आहे; कारण या भागात अधिकारी यांचा विशेष प्रभाव आहे.
गेल्या २७ नोव्हेंबर रोजी अधिकारी यांनी परिवहन मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांची समजूत काढण्यासाठी स्वत: ममता बॅनर्जी यांनीदेखील प्रयत्न केले होते, पण त्यांना यश आले नाही.
भाजपात प्रवेश करण्याची शक्यता
सुवेंदू अधिकारी येत्या शनिवारी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याच काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बंगालच्या दौर्यावर येणार असून, अधिकारी त्यांची भेट घेतील आणि तिथेच ते भाजपात प्रवेश करतील, असे त्यांच्या निकटच्या सूत्रांचे मत आहे.
आणखी दोन नेत्यांचे बंडाचे सूर
दरम्यान, तृणमूलचे वरिष्ठ खासदार सुनील मंडल आणि प्रभावशाली नेते जितेंद्र तिवारी यांनीही अधिकारी यांचे समर्थन करताना ममता बॅनर्जींविरोधात बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. पक्षावरून जनतेचा विश्वास उडत आहे, अनेक नेते जनतेची लूट करीत आहेत, मात्र ममता त्याकडे दुर्लक्ष करून प्रामाणिक आणि निष्ठावंत नेत्यांना अपमानित करीत असल्याचा आरोप या दोघांनी केला.