किमान तापमान : 30.02° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 45 %
वायू वेग : 2.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
26.96°से. - 30.45°से.
शनिवार, 16 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.01°से. - 30.73°से.
रविवार, 17 नोव्हेंबर घनघोर बादल27.06°से. - 30.41°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.16°से. - 31.05°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.39°से. - 30.44°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.66°से. - 30.5°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाशहैदराबाद, ४ डिसेंबर – हैदराबाद महानगर पालिकेच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारत, ४९ जागांवर विजय मिळविला आहे. आतापर्यंत सत्ता असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीला (टीआरएस) ५८ आणि मोठ्या विजयाचा दावा करणार्या एमआयएमला ४३ जागांवर समाधान मानावे लागले आहे. एकूणच या महापालिकेचे निकाल त्रिशंकू लागले आहेत.
मागील निवडणुकीत केवळ चार जागांवर असलेल्या भाजपाला या निवडणुकीत विजयी करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संपूर्ण शक्ती पणाला लावली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथसिंह आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जोरदार प्रचार केला होता. त्याचा भाजपाला प्रचंड फायदा झाला. या कामगिरीमुळे महापालिकेतील मुख्य विरोधी पक्षाचा दर्जाही एमआयएमला गमवावा लागणार आहे.
जुन्या हैदराबाद शहरात असदुद्दिन ओवैसींनी आपला प्रभाव कायम ठेवला. तथापि, या पक्षाला तिसर्या स्थानावर समाधान मानावे लागले. कॉंगे्रसला यावेळीही फक्त दोन जागाच जिंकता आल्या. या निवडणुकीत टीआरएसने सर्व १५० जागांवर उमेदवार उभे केले होते, तर भाजपाने १४९ जागा लढविल्या होत्या. मागील निवडणुकीत एक जागा जिंकणार्या तेलगू देसम्ला या वेळी भोपळाही फोडता आला नाही.
२०१६ च्या निवडणुकीत टीआरएसने सर्वाधिक ९९ जागा जिंकल्या होत्या, पण यावेळी महापालिकेत स्वबळावर सत्ता आणण्याचा या पक्षाचा मार्ग भाजपाने अडवला. भाजपाने ४९ जागा जिंकल्याने, पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. भाजपाने बहुतांश जागा टीआरएसकडून खेचून आणल्या आहेत.