किमान तापमान : 25.97° से.
कमाल तापमान : 27.32° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 41 %
वायू वेग : 9.47 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.32° से.
23.58°से. - 27.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी घनघोर बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलबंगलोर, (१५ फेब्रुवारी ) – सार्वजनिक क्षेत्रातील एरोनॉटिक्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अत्याधुनिक सशस्त्र ड्रोन एमक़्यु-९बी च्या इंजिनसाठी देखभाल सेवा प्रदान करणार आहे. आज बुधवारी येथे सुरू असलेल्या एअरशो ’एरो इंडिया २०२३’ दरम्यान अधिकार्यांनी सांगितले की, भारतात या ड्रोनच्या ऑपरेशनसाठी एचएएल आपले इंजिन सांभाळणार आहे. हा अमेरिकन ड्रोन संपूर्ण जगातील सर्वात प्रगत सशस्त्र ड्रोन मानला जातो.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि एमक़्यु-९बी ड्रोन बनवणारी अमेरिकन संरक्षण कंपनी जनरल अॅटोमिक्स एरोनॉटिकल सिस्टम्स इंक (जीए-एएसआय) ने देखभाल कराराची घोषणा केली. या करारानुसार एचएएल या ड्रोनच्या इंजिनची देखभाल आणि दुरुस्ती करणार आहे. ही घोषणा अशा वेळी आली, जेव्हा भारत जीए-एएसआय सोबत ३० एमक़्यु-९बी ड्रोन खरेदी करण्यासाठी चर्चा करत आहे. या कराराचे मूल्य सुमारे ३ अब्ज असण्याची शक्यता आहे. या ड्रोनमुळे भारताच्या निगराणी उपक्रमांना बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे. भारतीय नौदलाने हिंद महासागरात पाळत ठेवण्यासाठी २०२० मध्ये जनरल अॅटोमिक्सकडून दोन एमक़्यु-९बी ड्रोन भाडेतत्त्वावर घेतले होते. त्यावेळी ही भाडेपट्टी केवळ एक वर्षासाठी होती, मात्र नंतर ती वाढवण्यात आली.