किमान तापमान : 29.05° से.
कमाल तापमान : 29.68° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 4.04 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.68° से.
27.62°से. - 29.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.31°से. - 30.78°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल27.42°से. - 30.77°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.62°से. - 29.71°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.24°से. - 29.69°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.06°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– दोन वर्षांसाठी होती बंदी,
नवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या अख्यारित असलेल्या आयकर विभागाने बीबीसी या माध्यम संस्थेवर छापेमारी सुरू केली असताना, काँग्रेसने कांगावा करणे सुरू केले. मात्र, याच काँग्रेसचे केंद्रात सरकार असताना बीबीसीवर कारवाई करण्यात येऊन दोन वर्षांची बंदी लादण्यात आली होती, अशी माहिती समोर आली आहे.
आयकर विभागाने केलेली कारवाई कर अनियमिततेबाबत आहे. या कारवाईनंतर विरोधकांनी याचा संबंध थेट बीबीसीच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाशी जोडला आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. परंतु, बीबीसीवर कारवाई करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी काँग्रेसच्या काळातही भारताबाबत दुष्प्रचार पसरवण्याचा ठपका ठेवत, १९७० मध्ये इंदिरा गांधी सरकारने बीबीसीवर बंदी घातली होती. बीबीसीने दोन माहितीपट मालिका चालवल्या होत्या. कलकत्ता व फँटम इंडिया अशी त्या दोन माहितीपटांची नावे होती. हे दोन्ही माहितीपट फ्रेंच दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले होते. या दोन्ही माहितीपटाच्या माध्यमातून बीबीसी भारताबाबत नकारात्मक चित्र जगासमोर मांडत असल्याचा आरोप इंदिरा गांधी सरकारने केला आणि बीबीसीवर दोन वर्षांची बंदी घातली होती.
१९७५ मध्ये आणिबाणी लागू झाली, तेव्हाही इंदिरा गांधी सरकारने बीबीसीवर बंदी घातली होती. जून २००८ मध्ये भारत सरकार आणि बीबीसी यांच्यात आणखी एक संघर्ष झाला होता. बीबीसीने वर्कशॉपमध्ये काम करणार्या मुलांचे पॅनोरमा शोमधील फुटेज दाखवले होते. यावर बराच गदारोळ झाला आणि बालमजुरीला भारत प्रोत्साहन देत असल्याचा आरोप बीबीसीकडून करण्यात आला होता. पण त्यानंतर ते सारे फुटेजच खोटे असल्याचे निष्पन्न झाले होते.