किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 29.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.99° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – वक्फ बोर्डाच्या धर्तीवर हिंदू धर्मासाठी सनातन बोर्ड स्थापन करण्यात यावा, अशी मागणी भाजपाच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केली आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी सनातन बोर्डाच्या स्थापनेला समर्थन दिले आहे. माध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, वक्फ बोर्ड असेल तर सनातन बोर्डही असायला हवा. मंदिरांनी हिंदूंच्या मुलांचे शिक्षण, त्यांचे औषधोपचार आणि नवीन मंदिरे बांधणे याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी सनातन मंडळाची गरज असेल तर, ते स्थापन झालेच पाहिजे. इतर अनेक देशांमध्ये जिथे हिंदूंच्या विरोधात आंदोलने होत आहेत, तेथील सरकारने यावर कारवाई करावी, असे मला वाटते.
साध्वी प्रज्ञा यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे एका संवादात सांगितले की, हिंदू नियमांनुसार चालतात. धर्माबद्दल बोलतो आणि धर्मातच जगतो. तो कुठेही, कोणालाही विरोध करीत नाही. वक्फ बोर्ड कोणाचीही जमीन कुठेही घेते आणि ही जमीन वक्फ बोर्डाची असल्याचे सांगितले जाते. मात्र, कायदेशीररीत्या बघितल्यास ती जमीन त्यांची नसते.
साध्वी प्रज्ञा म्हणाल्या की, भारतातच हिंदूंवर खूप अत्याचार झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत सर्वांना न्याय मिळू लागला. तरीही वक्फ बोर्डसारख्या संस्था कोणतीही जमीन घेतात आणि ती वक्फ बोर्डाची असल्याचे सांगतात. अशा प्रकारे भारतात फोफावत असलेले माफिया हिंदू मंदिरे आणि हिंदू देवतांचा अपमान करण्यात मागे हटत नाहीत.
आपल्या हिंदू देवतांची मंदिरे ट्रस्ट झाली की, ती सरकारच्या हातात जातात, ही एक गंमत आहे. यातून मुक्त व्हावे आणि हिंदूंचे पैसे म्हणजे मठ आणि मंदिरात जाणारे श्रद्धेचे दान हिंदूंच्या विकासावर, हिंदू मुलांचे शिक्षण, त्यांचे रोगनिदान आणि मंदिर उभारणीवर खर्च केले जावे. त्यासाठी सनातन मंडळाची गरज भासल्यास ते स्थापन करावे, अशी मागणीही त्यांनी पुढे रेटली.