किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 30.99° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
30.99° से.
27.62°से. - 30.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलनवी दिल्ली, (१५ फेब्रुवारी ) – राष्ट्रीय राजधानीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये उद्यापासून ’आदी महोत्सवा’ला सुरुवात होणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन केले जाणार आहे, अशी माहिती केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले. २७ फेब्रुवारीपर्यंत चालणार्या या ’आदी महोत्सव’मध्ये बाजरीपासून स्वयंपाक करण्याच्या पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी आणि बाजरीशी संबंधित उत्पादनांची विक्री करण्यासाठी देशभरातील आदिवासी कारागिरांना महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे.
यासंदर्भात बोलताना केंद्रीय आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा यांनी सांगितले की, बाजरी हा आदिवासी समाजाच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. भारताच्या पुढाकारावर संयुक्त राष्ट्रांनी २०२३ हे ’आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रथम पारितोषिक मिळविलेल्या मंत्रालयाची झांकीही महोत्सवादरम्यान प्रदर्शित करण्यात येणार आहे. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्रालयांतर्गत ’ढठखऋएॄ’ ही संस्था आदिवासी कारागीर आणि महिलांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी ’आदी महोत्सव’ आयोजित करते. या महोत्सवात २८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील सुमारे ५०० आदिवासी कारागीर आणि कलाकार सहभागी होणार आहेत. यामध्ये १९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील आदिवासी स्वयंपाकींचा समावेश आहे. यादरम्यान २० ’फूड स्टॉल’ उभारण्यात येणार आहेत.