किमान तापमान : 28.91° से.
कमाल तापमान : 31.63° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 7.81 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
31.63° से.
27.62°से. - 32.99°से.
रविवार, 17 नोव्हेंबर टूटे हुए बादल28.21°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर छितरे हुए बादल27.54°से. - 31.18°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.65°से. - 30.02°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश26.41°से. - 29.99°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश26.01°से. - 29.32°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादलबंगळुरू, (१५ फेब्रुवारी ) – अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्राकरिता जी भांडवली तरतूद करण्यात आली आहे, त्यातील ७५ टक्के निधी देशात उत्पादन होणार्या शस्त्र आणि अन्य उपकरणांच्या खरेदीसाठी खर्च केला जाईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी बुधवारी येथे केली. बंगळुरू येथे मागील तीन दिवसांपासून एअरो इंडिया शो सुरू आहे. यात अमेरिकेसह इतर काही देश सहभागी झाले आहेत. यात अनेक महत्त्वाचे संरक्षण करारही होत आहेत. याच कार्यक्रमात राजनाथसिंह यांनी उपरोक्त घोषणा केली. त्यांच्या घोषणेचा सोपा अर्थ सांगायचा झाल्यास स्वदेशी शस्त्र आणि लष्करी सामग्री खरेदी करण्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांचा निधी वेगळा ठेवावा लागणार आहे.
हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. कारण, यामुळे देशातील संरक्षण उत्पादन क्षेत्र आणखी मजबूत होणार आहे, असे ते म्हणाले. यावेळी राजनाथसिंह यांनी डिफेन्स इंडिया स्टार्ट अप चॅलेंजच्या नवव्या आवृत्तीची घोषणा केली. या एअरो शोच्या माध्यमातून भारताला जगातील बड्या संरक्षण कंपन्यांसोबत करार करण्याची आणि त्यांच्यासोबत वाटचाल करण्याची संधी मिळाली आहे, असे ते म्हणाले.
संरक्षण मंत्रालयाने इनोव्हेशन फॉर डिफेन्स एक्सेलेंस (आयडीइएक्स), स्टार्ट अप आणि एमएसएमई अर्थात् लघु व मध्यम उद्योगाकडून संरक्षण सामग्री खरेदी करण्याची परवानगी दिली आहे. ही खरेदी प्रक्रिया सुलभ आणि गतिमान राहणार आहे. नव्या उद्योगांनाही संरक्षण उत्पादन क्षेत्रात येण्यास प्रोत्साहित करण्यासाठी अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला असल्याची माहिती संरक्षण मंत्र्यांनी दिली.