किमान तापमान : 25.79° से.
कमाल तापमान : 25.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 44 %
वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
25.99° से.
24.14°से. - 26.13°से.
शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.01°से. - 27.57°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.47°से. - 27.72°से.
सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल25.66°से. - 27.64°से.
मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश25.05°से. - 27.04°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादलनवी दिल्ली, २६ जून – जम्मू-काश्मीरबाबतची सर्वपक्षीय बैठक समाधानकारकपणे पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदलाकडे लागले आहे. यावेळी २७ नव्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत तसेच मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर राज्यात विधानसभा निवडणूक घेण्यावर बैठकीत जवळपास एकमत झाले आहे. राज्यात राजकीय प्रक्रिया सुरू करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना या बैठकीतून दिशा मिळाली आहे, त्यामुळे मोदी सरकार उत्साहात आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या उत्तरप्रदेशच्या पाच दिवसाच्या दौर्यावर आहेत. तिथून ते २९ जूनला दिल्लीत परतणार आहेत. त्यामुळे ३० जूननंतर मंत्रिमंडळाच्या विस्ताराची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
ज्योतिरादित्य, सुशीलकुमार यांच्या नावांची चर्चा
कॉंग्रेसमधून भाजपात आलेले ज्योतिरादित्य शिंदे, बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, राजस्थानचे भाजपा नेते भूपेंद्र यादव, मध्यप्रदेशचे भाजपा नेते कैलास विजयवर्गीय, सैयद जफर इस्लाम यांची संभाव्य मंत्री म्हणून मंत्रिमंडळात समावेशाची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे, तसेच ज्येष्ठ भाजपा नेते गोपीनाथ मुंडे यांची कन्या प्रीतम मुंडे यांच्या नावाची चर्चाही सुरू आहे.
उत्तरप्रदेश भाजपाचे अध्यक्ष स्वतंत्रदेवसिंह, वरुण गांधी तसेच गुजरात प्रदेश भाजपाचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांचाही मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. लडाखचे जामयांग त्सेरिंग नामग्याल तसेच दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने अपना दलच्या अनुप्रिया पटेल तसेच लोजपाचे पशुपतीकुमार पारस यांच्याही मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा आहे. जदयूचे आरसीपी सिंह तसेच संतोषकुमार यांचाही समावेश होऊ शकतो.
२७ जणांचा होऊ शकतो समावेश
यावेळचा मंत्रिमंडळाचा विस्तार मोठा राहू शकतो. ३० मे २०१९ रोजी मोदी मंत्रिमंडळ सत्तारूढ झाल्यानंतर होणारा हा मंत्रिमंडळाचा पहिलाच विस्तार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांनी ३० जूनला मंत्रिपरिषदेची बैठक बोलावली आहे. मोदी मंत्रिमंडळात सध्या ५४ मंत्री आहेत. नियमाप्रमाणे मोदी आपल्या मंत्रिमंडळात ८१ जणांचा समावेश करू शकतात. म्हणजेच यावेळी २७ जणांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो.