किमान तापमान : 25.5° से.
कमाल तापमान : 27.83° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 47 %
वायू वेग : 9.86 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.83° से.
23.58°से. - 28.99°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 27.04°से.
शनिवार, 25 जानेवारी टूटे हुए बादल25.05°से. - 27.61°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.42°से. - 28.19°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.65°से. - 27.75°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.13°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलपंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन,
नवी दिल्ली, २६ जून – रामाच्या नगरीला म्हणजे अयोध्येला आध्यात्मिक आणि वैश्विक पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्यासोबत कायमस्वरूपी स्मार्ट शहर म्हणून विकसित करायचे आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केले.
पंतप्रधान मोदी यांनी आज अयोध्या विकास प्रकल्पाचा आभासी पद्धतीने आयोजित बैठकीत आढावा घेतला. यावेळी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उपमुख्यमंत्रीद्वय केशवप्रसाद मौर्य आणि दिनेश शर्मा यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अयोध्येतील मानवी संस्कृतीची सांगड भविष्यातील पायाभूत सुविधांशी मिळतीजुळती असली पाहिजे. अयोध्येच्या नवीन ओळखीचा जल्लोष साजरा करताना नवीन पद्धतीने अयोध्येची सांस्कृतिक ओळख जिवंत ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता मोदी यांनी व्यक्त केली.
अयोध्या प्रत्येक भारतीयासाठी सांस्कृतिक चेतनेचे शहर आहे, त्यामुळे तेथील प्रत्येक प्रकल्पात उत्कृष्ट परंपरा तसेच सर्वश्रेष्ठ विकासात्मक बदलाचे दर्शन व्हायला पाहिजे, असे मोदी म्हणाले. भगवान राम यांच्यात लोकांना एकत्र आणण्याची आणि जोडण्याची क्षमता होती, ती लक्षात घेऊन अयोध्येच्या विकास कामात स्वस्थ भागिदारी असली पाहिजे. विशेषत: तरुणांना या कामात सहभागी करून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदी यांनी केले.
अयोध्येला आध्यात्मिक व वैश्विक पर्यटन केंद्र तसेच टिकाऊ स्मार्ट सिटी म्हणून विकसित केले जाणार आहे. अयोध्येतील पायाभूत सुविधा तसेच अत्याधुनिक दळणवळणाची साधने याबाबतचे सादरीकरण करण्यात आले. अयोध्येत विमानतळ, रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच राष्ट्रीय महामार्ग कशा पद्धतीने विकसित केले जाणार याबाबत पंतप्रधानासमोर आढावा सादर करण्यात आला.
शरयूत जलपर्यटन सुविधा
शरयू नदी तसेच तिच्या घाटांचा विकास करण्याबाबत तसेच शरयू नदीत जलपर्यटनाची सुविधा विकसित करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. अयोध्या असे शहर आहे, जे सांस्कृतिकदृष्ट्या प्रत्येक भारतीयाच्या मनात बसले आहे. त्यामुळे भविष्यात अयोध्येत येण्याची प्रेरणा तसेच इच्छा प्रत्येक भारतीयाच्या मनात जागेल, अशा पद्धतीने आम्हाला अयोध्येचा विकास करायचा आहे, असे मोदी म्हणाले. अयोध्येत विकासाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी आहे, आम्हाला अयोध्येच्या विकासाला एका नव्या टप्प्यात आणि नव्या बदलासह न्यायचे आहे, असे ते म्हणाले.