किमान तापमान : 24.97° से.
कमाल तापमान : 24.98° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 55 %
वायू वेग : 4.96 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
24.98° से.
23.58°से. - 26.11°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.36°से. - 27.01°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
बुधवार, 29 जानेवारी कुछ बादलनवीन बाधित ५० हजारच्या कमी,
नवी दिल्ली, २६ जून – देशात कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली असली, तरी डेल्टा प्लस या नव्या आणि तितक्याच घातक व्हेरिएंटमुळे धोका वाढला आहे. मागील चोवीस तासांत ५० हजारांपेक्षा कमी बाधितांची नोंद झाली, तिथेच डेल्टा प्लस आता दहा राज्यांमध्ये पोहोचला असून, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या राज्यांसह इतर राज्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्रासह दहा राज्यांमधून नमुने गोळा करण्यात आले होते. त्यांच्या चाचणीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. आता धोका आणखी वाढला आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करण्यासोबतच, राज्यांच्या आरोग्य यंत्रणांनीही आवश्यक ती पावले उचलण्याची गरज असल्याचे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज शनिवारी देशातील कोरोनाविषयक माहिती जाहीर केली आहे.
ऋ देशभरात ४८,६९८ नव्या बाधितांची भर पडल्याने, एकूण संक्रमितांची संख्या ३ कोटी १ लाख ८३ हजारांवर गेली आहे.
ऋ ६४,८०० पेक्षा जास्त बाधितांनी कोरोनावर मात केल्याने, आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २.९२ कोटींपेक्षा जास्त झाली आहे.
ऋ १,१८३ जणांचा मृत्यू झाल्याने, देशातील एकूण बळींची संख्या ३.९४ लाखांवर गेली आहे.
ऋ देशभरात सध्या ५.९५ लाख सक्रिय बाधित असून, हे प्रमाण आता अवघे १.९७ टक्क्यांवर आले आहे.
तामिळनाडूत डेल्टा प्लसचा पहिला मृत्यू
महाराष्ट्रापाठोपाठ तामिळनाडूतही कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने पहिल्या बळीची नोंद केली आहे. मदुराई येथील रुग्णालयात या बाधितांचा मृत्यू झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली. कोरोनाच्या या नव्या प्रकाराची तिघांना लागण झाली होती. यातील दोघांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
चाचण्या ४० कोटींवर
देशात आतापर्यंत करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यांची संख्या ४० कोटींवर गेली आहे. ही ऐतिहासिक अशीच कामगिरी ठरली आहे. जून महिन्यात दररोज १८ लाखांवर चाचण्या करण्यात येत आहेत. देशात शुक्रवारी सायंकाळपर्यंत ४० कोटी १८ लाख ११ हजार ८९२ चाचण्यांची नोंद करण्यात आली.
आठवडाभरात ३.३० कोटी लोकांचे लसीकरण
नवी दिल्ली : २१ जून रोजी लसीकरणाचा नवा टप्पा सुरू झाल्यानंतर अवघ्या एकाच आठवड्यात देशात ३.३० कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले असून, हा एक विक्रम ठरला आहे. या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी ८६ लाख लोकांनी लस घेतली होती. महाराष्ट्रात याच काळात ६ लाखांवर लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरणाचा वेग कायम ठेवा ः मोदी
लसीकरणाचा नवीन टप्पा सुरू झाल्यापासून देशात लसीकरणाला प्रचंड वेग आला आहे. ही गती अशीच कायम ठेवणे आवश्यक आहे. ही मोहीम अधिक व्यापक करण्यासाठी यात स्वयंसेवी संस्था आणि इतर संघटनांनाही सहभागी करायला हवे, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी केल्या.
पंतप्रधानांनी आज एका उच्चस्तरीय बैठकीत देशातील कोरोनास्थितीचा आढावा घेतला. अलिकडील काळात लस घेण्यासाठी नागरिकांमध्ये जो उत्साह पाहायला मिळत आहे, तो असाच कायम असणे आवश्यक आहे. अवघ्या सहा दिवसांत ३.७७ कोटी लोकांनी लस घेतली. देशातील १२८ जिल्ह्यांमध्ये ४५ वर्षांवरील ५० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी आणि १६ जिल्ह्यांमध्ये याच वयोगटातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त नागरिकांनी लस घेतली आहे, याकडे या बैठकीत पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यात आले.
केंद्रीय आणि राज्यस्तरीय यंत्रणांनी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी संबंधित राज्यांच्या यंत्रणांना आवश्यक ती मदत करावी आणि जनतेतही जागृती निर्माण करावी, अशी सूचनाही पंतप्रधानांनी यावेळी केली.
स्वयंसेवी संस्था इतर सामाजिक संघटना यात चांगली व प्रभावी कामगिरी पार पाडू शकतात. त्यांची मदत फायद्याचीच ठरेल. या संघटनांनी देखील राज्य सरकारच्या संपर्कात राहावे, असेही पंतप्रधान म्हणाले.
जाणून घ्या काय आहे डेल्टा प्लस व्हेरिएंट?
कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात येत असताना, डेल्टा प्लस या घातक व्हेरिएंटने देशात थैमान घालायला सुरुवात केली. हा नवा विषाणू झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्यप्रदेशसह काही राज्यांमध्ये या नव्या प्रकारातील बाधितही आढळले आहेत. कोरोनाचा हा नवीन डेल्टा प्लस नेमका काय आहे आणि त्याची लक्षणे कोणती, याविषयी जाणून घेऊ या.
कोरोनाचा नवीन डेल्टा प्रकार म्हणजेच बी.१.६१७.२ प्रथम भारतात आढळला. आता हळूहळू इतर देशांमध्ये त्याचा फैलाव झाला आहे. कोरोना विषाणूच्या स्वरूपात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे आधी डेल्टा आणि आता डेल्टा प्लस हा नवीन प्रकार तयार झाला. हा विषाणू प्रथम युरोपमध्ये आढळला होता. स्पाईक प्रोटिन हा कोरोना विषाणूचा मुख्य भाग आहे, ज्याच्या मदतीने हा विषाणू मनुष्याच्या शरीरात प्रवेश करून संसर्ग पसरवतो.
कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटमध्ये सर्वांत धोकादायक गोष्ट म्हणजे तो आतापर्यंतच्या सर्व प्रकारांमध्ये अतिशय वेगाने पसरत आहे. अल्फा प्रकार वेगवान असला तरी, डेल्टा प्रकार ६० टक्के अधिक संसर्गजन्य आहे.
अशी आहेत लक्षणे
ऋ सामान्य लक्षणे म्हणजे ताप, कोरडा खोकला आणि थकवा
ऋ त्याच्या तीव्र लक्षणांमध्ये छातीत दुखणे, धाप लागणे आणि श्वास घेण्यास त्रास होतो
ऋ त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल होणे
ऋ सामान्य लक्षणांमध्ये घसा खवखवणे, चव आणि गंध कमी होणे, डोकेदुखी आणि अतिसार
कसा करायचा बचाव?
ऋ घराबाहेर पडताना दुहेरी मुखाच्छादन घाला
ऋ आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडा
ऋ २० सेकंद साबणाने हात स्वच्छ धुवा
ऋ भौतिक दूरतेचे पालन करा.
ऋ घरातल्या आणि आसपासच्या वस्तू स्वच्छ ठेवा
ऋ बाहेरून सामान आणल्यास निर्जंतुकीकरण करा