किमान तापमान : 23.43° से.
कमाल तापमान : 24.3° से.
तापमान विवरण : clear sky
आद्रता : 53 %
वायू वेग : 4.78 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.43° से.
22.99°से. - 27.01°से.
शुक्रवार, 24 जानेवारी साफ आकाश24.95°से. - 27.79°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.46°से. - 28.06°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.51°से. - 27.86°से.
सोमवार, 27 जानेवारी कुछ बादल25.2°से. - 26.87°से.
मंगळवार, 28 जानेवारी कुछ बादल24.73°से. - 26.29°से.
बुधवार, 29 जानेवारी घनघोर बादलबॅटरी बसविल्याने विषाणू त्वरित नष्ट, देशातील पहिला यशस्वी प्रयोग,
मुंबई, २७ जून – कोरोनाच्या पृष्ठभूमीवर मुंबईच्या नसरी मोनजी स्कूल ऑफ सायन्सने ‘टीपी१००’ म्हणजेच म्हणजेच ‘टोटल प्रोटेक्शन मुखाच्छादन’ची निर्मिती केली आहे. हा देशातील पहिला बॅटरीवर चालणारा मुखाच्छादन असून यात बॅटरीसोबत कॉपर फिल्टरचा वापर करण्यात आला आहे.
कोरोना अथवा अन्य कोणताही विषाणू या बॅक्टरीयुक्त मुखाच्छादनाच्या संपर्कात येताच किंवा पृष्ठभागावर जमा होताच काही क्षणात तो नष्ट होतो. त्यामुळे या मुखाच्छादनाच्या वापरामुळे आपण पूर्णपणे सुरक्षित राहणार असल्याचे नसरी मुनजी स्कूल ऑफ सायन्सच्या प्राध्यापकांनी म्हटले आहे. या प्राध्यापकांनी याची निर्मिती केली आहे. मागील ८ महिन्यांपासून अशाप्रकारच्या मुखाच्छदानाच्या संशोधनावर नरसी मोनजी स्कूल ऑफ सायन्सचे अधिष्ठाता डॉ. नितीन देसाई आणि प्रा. डॉ. वृषाली जोशी हे काम करीत होते. सर्व संशोधन झाल्यानंतर हे मुखाच्छादन वापरासाठी पूर्णपणे तयार झाले असून, आता लवकरच ते बाजारात येणार आहे. या मुखाच्छादनाच्या संशोधनाचे दोन पेटंट सुद्धा मिळाले आहे. ४० विविध डिझाईनमध्ये याची निर्मिती करण्यात आली आहे. या ‘टोटल प्रोटेक्शन मास्कची’ निर्मिती स्वत: नरसी मुनजी विद्यापीठ करणार असून मिल्टन फार्मा कंपनी हे मुखाच्छादन बाजारात आणणार आहे.
कसे काम करते?
या मुखाच्छादनाच्या वापराने तुम्ही विषाणूपासून पूर्णपणे सुरक्षित राहणार आहात. सध्या वापरत असलेल्या साध्या कापडी अथवा एन-९५ मुखाच्छादनामुळे हवा शुद्ध होते, पण या ‘टीपी१००’ मुखाच्छादनाला बॅटरी बसविली असल्याने विषाणूचा नायनाट होतो. कारण, यात कॉपर फिल्टर वापरले आहे व त्याला बॅटरी जोडली आहे. साधारणपणे ३ व्होल्टपर्यंतचा पुरवठा कॉपर फिल्टरला करण्यात येतो. या चार्ज कॉपर फिल्टरमुळे विषाणू, जिवाणू, फंगस जे या पृष्ठभागावर येतात ते ‘न्यूट्रल’ अर्थात नष्ट होतील. त्यामुळे आपल्याला संपूर्ण संरक्षण मिळेल, असे या मुखाच्छादनाची निर्मिती करणारे प्राध्यापक डॉ. नितीन देसाई यांनी सांगितले.
या मुखाच्छादनाची बाहेरील बाजू ‘वॉशेबल’ असून, सहा महिन्यांपर्यत याची बॅटरी टिकू शकते. त्यामुळे साधारणपणे एक मुखाच्छादन ६ महिने सहज वापरू शकत असल्याने साधारणपणे रोज वापरत असलेले ३०० मास्क आपण वापरणे टाळू शकतो. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा या मुखाच्छादनाची निर्मिती महत्त्वाची ठरते. शिवाय, या बॅटरीचा परिणाम अगदी कमी असल्याने त्याचा कोणताही परिणाम मुखाच्छादन घातल्यानंतर नाकावर, मोबाईल वापरताना किंवा यावर पाणी पडल्यावर सुद्धा होणार नाही, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे.