किमान तापमान : 24.16° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 57 %
वायू वेग : 7.45 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.71°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलमुंबई, ४ डिसेंबर – आभासी चुकार्यांच्या सुरक्षेसाठी भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच नियम आणणार असल्याची माहिती गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज शुक्रवारी दिली. या नियमांमुळे आभासी (ऑनलाईन) पद्धतीने केले जाणारे व्यवहार सुरक्षित होतील आणि वापरकर्त्यांसाठी सुविधाजनक असतील, असे रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या निवेदनात दास यांनी म्हटले आहे.
या दिशानिर्देशांमध्ये इंटरनेट, मोबाईल बँकिंग, कार्ड्सच्या माध्यमातून होणार्या चुकार्यांसाठी सामान्य सुरक्षा नियंत्रणावरील काही किमान मापदंड मजबूत करण्याची तसेच शासन व्यवस्था, अंमलबजावणी आणि देखरेखीची आवश्यकता असेल, असे त्यांनी सांगितले. या नियमांबाबत नागरिकांच्या सूचना मागवण्यासाठी लवकरच एक मसुदा जाहीर केला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
मागील दोन वर्षांपासून ग्राहकांच्या तक्रारी वाढल्यानंतर एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट काडर्सची विक्री करण्यास किंवा नवीन डिजिटल बँकिंग उपक्रम सुरू करण्यास मनाई केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने याबाबत घोषणा केली आहे. देशातील सर्वांत मोठी भारतीय स्टेट बँकेच्या ऍपमध्येही गुरुवारी समस्या आल्या. आठवड्यातून दुसर्यांदा स्टेट बँकेला ग्राहकसेवा देताना अडचण आली. वित्तीय स्थैर्य आणि ग्राहकहित जपण्याला रिझर्व्ह बँकेकडून सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. यस बँक आणि लक्ष्मी विलास बँकेबाबत याच दिशेने निर्णय घेण्यात आले, असे दास यांनी सांगितले. नियम अधिक कठोर करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे आणि वित्तीय क्षेत्रातील संस्था आणि गैर-बँकिंग वित्तीय कंपन्यांवर आमची नजर आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी तसेच धोक्याचे व्यवस्थापन आणि अंतर्गत नियंत्रणाला आम्ही सर्वोच्च प्राधान्य देत आहोत, असे त्यांनी सांगितले. वित्तीय क्षेत्रातील स्थैर्यासाठी बँका आणि गैर-बँकिंग वित्तीय संस्था या पहिल्या फळीतील संरक्षक आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.