किमान तापमान : 24.72° से.
कमाल तापमान : 27.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 54 %
वायू वेग : 6.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
27.99° से.
23.71°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी छितरे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलकिमान हमी भावाविषयी केंद्राने केले आश्वस्त,
नवी दिल्ली, ३ डिसेंबर – केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये नवीन शेतीविषयक कायद्यांबाबत चर्चेची चौथी फेरी आज संपुष्टात आली. दिल्लीतील विज्ञान भवनात तब्बल सात तास चाललेल्या या बैठकीत आजही कुठलाच तोडगा निघाला नाही. शेतकर्यांच्या प्रतिनिधींनी कृषी कायद्यांतील काही तरतुदींविषयी वाटणारी चिंता सरकारकडे व्यक्त केली. आता पुढील चर्चेची फेरी शनिवारी दुपारी अडीच वाजता होणार आहे. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) संपुष्टात येणार नाही, असे स्पष्ट आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी पुन्हा एकदा शेतकर्यांना दिले.
माध्यमांना संबोधित करताना नरेंद्रसिंह तोमर म्हणाले की, आम्ही शेतकर्यांच्या सर्व समस्या व चिंता ऐकून घेत आहोत. सरकार खुल्या मनाने प्रत्येक मुद्यावर चर्चा करायला तयार आहे. त्यामुळे थंडी व अन्य अडचणी लक्षात घेऊन शेतकर्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन देखील तोमर यांनी केले.
ते पुढे म्हणाले, मागच्या आणि आजच्या बैठकीत काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. नवीन कायद्यांमुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या समाप्त होतील, अशी चिंता शेतकर्यांना वाटत असल्याचे तोमर यांनी सांगितले.
आजच्या बैठकीत वाणिज्य मंत्री पीयूष गोयल हे देखील सहभागी झाले होते. बाजार समित्या आणखी मजबूत व्हाव्यात व त्याचा उपयोग वाढावा, याबाबत सरकार विचार करेल. नवीन कायद्यांमध्ये बाजार समित्यांच्या चौकटीबाहेरील खाजगी बाजारपेठांसाठी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही एएमपीसी कायद्यांतर्गत खाजगी तसेच मंडईंसाठी समान कर लावण्यावरही विचार करू, असेही कृषी मंत्री तोमर यांनी स्पष्ट केले.
चर्चा प्रगतिपथावर : राकेश टिकैत
केंद्र सरकारने किमान हमी भावावर सकारात्मक संकेत दिले आहोत. चर्चेत आणखी थोडी प्रगती झाली आहे, असे सरकारसमवेत सुरू असलेली बैठक संपल्यानंतर भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले. आझाद किसान संघर्ष समितीचे हरजिंदरसिंग टांडा हे देखील चर्चेत सहभागी झाले होते.
सरकारी जेवण नाकारले
वास्तविक दुपारी १२ वाजता सुरू झालेल्या बैठकीत काही काळ जेवणासाठी मध्यंतर घेण्यात आला. दरम्यान, सरकारकडून शेतकरी नेत्यांची जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, पण शेतकरी नेत्यांनी सरकारच्यावतीने देण्यात आलेले जेवण नाकारले आणि स्वत:साठी लंगरमधून जेवण मागविले.
पुरस्कार वापसी सुरू
पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी शेतकर्यांच्या समर्थनार्थ आणि कृषी कायद्याच्या निषेधार्थ पद्मविभूषण पुरस्कार परत केला. या व्यतिरिक्त शिरोमणी अकाली दल (डेमोक्रेटिक) प्रमुख आणि राज्यसभेचे खासदार सुखदेवसिंग धिंडसा यांनी देखील पद्मभूषण परत करण्याची घोषणा केली आहे. प्रकाशसिंग बादल यांच्या व्यतिरिक्त पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार विजेता कुस्तीपटू करतार सिंह, अर्जुन पुरस्कार विजेता बास्केटबॉल खेळाडू सज्जनसिंग चिमा आणि अर्जुन पुरस्कार हॉकीपटू राजबीर कौर यांनी पुरस्कार परत देण्याची घोषणा केली.
ठळक मुद्दे
शेतकरी-सरकारमध्ये चौथ्या फेरीची चर्चा
जवळजवळ साडेसात तास चालली बैठक
किमान हमी भावावर आश्वासन