किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.91° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.91° से.
23.74°से. - 27.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलऍडमिरल करमबीरसिंह यांची ग्वाही, लष्कर, हवाई दलाशी योग्य समन्वय,
नवी दिल्ली, ३ डिसेंबर – कोणत्याही सागरी धोक्याचा सामना करण्यासाठी नौदल पूर्णपणे सज्ज असल्याची ग्वाही नौदलप्रमुख ऍडमिरल करमबीरसिंह यांनी आज गुरुवारी दिली. दक्षिण चीन समद्रात चीन आपले वर्चस्व वाढविण्याचा प्रयत्न करीत असला, तरी त्यांचे वर्चस्व झुगारून लावण्याची क्षमता आमच्यात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नौदल दिनानिमित्त ते पत्रपरिषदेला संबोधित होते. भारतीय समुद्रात अलिकडील काळात काही धोके पाहायला मिळाले आहेत. ते हाताळण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. या क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्यावर आमचा नेहमीच भर राहिलेला आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी लडाखच्या पूर्वेकडील सीमेवरही मत मांडले. पी-८ आय टेहळणी विमाने आणि हेरॉन ड्रोन्स या भागात आम्ही तैनात केली आहेत. या सीमेवर आम्ही लष्कर आणि हवाईदलासोबत योग्य समन्वय साधला आहे. देशाची तिन्ही सशस्त्र दले एकमेकांच्या सहकार्याने येथे कोणताही धोका परतवून लावण्यासाठी सक्षम आहेत, असे ते म्हणाले.
भारतापासून कुणालाही धोका नाही
भारत एक शक्तिशाली देश म्हणून उदयास येत असला, तरी इतर कोणत्याही देशाला आमच्यापासून कुठलाही धोका निर्माण होणार नाही. कुणालाही त्रास होईल, असे कोणतेही कृत्य भारत कधीच करणार नाही. शेजारील देशांमध्ये स्थिरता कायम ठेवणे, हेच आमचे धोरण असल्याची भूमिका संरक्षण मंत्रालयाने आज गुरुवारी विशद केली..