किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 29.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.69° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल-पाच मागण्यांवर विस्तृत चर्चा,
नवी दिल्ली, (०९ ऑगस्ट) – आयटीएलएफ अर्थात् इंडिजिनस ट्रायबल लीडर्स फोरमच्या शिष्टमंडळाने बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची येथे भेट घेतली. यावेळी मणिपूर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेसह महत्त्वाच्या पाच मागण्यांवर विस्तृत चर्चा केली. शाह यांनी बैठकीसाठी या शिष्टमंडळाला निमंत्रित केले होते.
३ मेपासून पूर्वेकडील मणिपूरमध्ये आदिवासींच्या दोन समुदायात हिंसाचार सुरू आहे. यात जीवितहानीसह मोठ्या प्रमाणात आर्थिकहानी झाली असून, राज्यात शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था पूर्ववत करण्याच्या हेतूने आयटीएलएफच्या शिष्टमंडळाने आज अमित शाह यांची भेट घेतली. या संदर्भात आयटीएलएफचे सचिव मुआन टोम्बिंग यांनी सांगितले की, शिष्टमंडळाने शाह यांना राज्यातील एकूण परिस्थितीची माहिती देत काही प्रमुख मागण्या सादर केल्या. कुकी समुदायाला मणिपूरपासून वेगळे करण्यात यावे. याशिवाय कुकींचे मृतदेह इम्फाळमधून चुराचांदपूर येथे हलविण्यात येऊन त्यावर अंत्यसंस्काराची प्रकि‘या पुढील पाच दिवसांपर्यंत वाढविण्याची मागणी पुढे केली.
प्रकरण असे …
मणिपूर राज्यातील कुकी आणि मैतेई असे दोन प्रमुख आदिवासी समुदाय वास्तव्यास आहे. मागील ३ मे रोजी मैतेईबांधवांनी अनुसूचित जमाती (एसटी) असा दर्जा देण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीच्या समर्थनार्थ ३ मे रोजी राज्याच्या काही भागात आदिवासी एकजुटता मोर्चा आयोजित केला होता. मात्र, कुकींनी त्याला विरोध करीत हिंसाचार सुरू केला. यात आतापर्यंत १६० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना विस्थापित व्हावे लागले.