किमान तापमान : 23.22° से.
कमाल तापमान : 23.68° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 53 %
वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
23.22° से.
22.99°से. - 26.27°से.
शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल23.33°से. - 26.99°से.
शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश25.18°से. - 27.4°से.
रविवार, 26 जानेवारी साफ आकाश25.53°से. - 27.91°से.
सोमवार, 27 जानेवारी साफ आकाश25.66°से. - 27.88°से.
मंगळवार, 28 जानेवारी घनघोर बादल25.01°से. - 27.35°से.
बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल– सुरेश सोनी यांचे प्रतिपादन,
मुंबई, (०९ ऑगस्ट) – स्व. मदनदासजी देवी यांच्याकडे केवळ संघटनेला देशव्यापी बनवणे, सक्षम बनविणे हेच लक्ष्य नव्हते, तर संघटनेला विकसित करण्याची विशेषतः होती. त्यांनी असे संघटनशास्त्र विकसित केले की, व्यक्तीच्या जाण्याचा परिणाम संघटनेवर होणार नाही, पुढचा कार्यकर्ता त्याची जागा घेईल. भावना आणि विवेक यांचे संतुलन साधत विकास करणे, हे त्यांचे वैशिष्ट्य प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय कार्यकारिणीचे सदस्य सुरेश सोनी यांनी येथे केले.
येथील दादर पूर्वमधील हिंदू कॉलनीत स्थित राजा शिवाजी विद्यालय संकुलातील बी. एन. वैद्य सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत आपले श्रद्धासुमन अर्पित करताना ते बोलत होते. २४ जुलै रोजी मदनदासजी देवी यांचे बंगळुरू येथे निधन झाले होते, त्यानंतर त्यांच्या श्रद्धांजली सभांचे आयोजन देशभरात सुरू आहे. याप्रसंगी त्यांचा सहवास लाभलेल्या कार्यकर्त्यांनी आपली शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण केली. अरुण करमरकर, निर्मला देवी आपटे, सतीश कुळकर्णी, रवी एरंडे, अमोल विठाले, गीता गुंडे, संजय पाचपोर, विनय देवी, सुनील सप्रे आणि संघाचे अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली. बहुतेक सर्वच याप्रसंगी भावुक होऊन आपल्या आठवणींना उजाळा देत मदनदासजींच्या जीवनाचा एकेक पैलू उलगडून दाखवत होते.
सूत्रसंचालन विलास भागवत यांनी केले व त्यांनीही अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी भाजपाचे आमदार मंगलप्रभात लोढा, आशिष शेलार, प्रसाद लाड, राम नाईक, प्रवीण दरेकर, शायना एन सी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.