किमान तापमान : 29.09° से.
कमाल तापमान : 29.69° से.
तापमान विवरण : broken clouds
आद्रता : 62 %
वायू वेग : 5.63 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
29.69° से.
27.3°से. - 30.22°से.
रविवार, 17 नोव्हेंबर हल्की वर्षा27.95°से. - 31.2°से.
सोमवार, 18 नोव्हेंबर टूटे हुए बादल26.92°से. - 31.17°से.
मंगळवार, 19 नोव्हेंबर साफ आकाश26.02°से. - 30.17°से.
बुधवार, 20 नोव्हेंबर साफ आकाश25.59°से. - 30.1°से.
गुरुवार, 21 नोव्हेंबर साफ आकाश25.4°से. - 29.75°से.
शुक्रवार, 22 नोव्हेंबर छितरे हुए बादल– ग्रामीण भागातील बहुतांश पालकांना कन्येला पदवीधर करण्याची इच्छा,
नवी दिल्ली, (०९ ऑगस्ट) – शिक्षण हा सर्वांचा मूलभूत अधिकार मानून त्यानुसार सर्वांना शिक्षण मिळालेच पाहिजे, हे धोरण शासनस्तराव अवलंबिण्यात आले. मात्र, फार पूर्वीपासून सामाजिक स्तरावर शिक्षणाच्या बाबतीत मुलगा-मुलगी हा भेद कायम राहिला आहे. त्यातही ग्रामीण भागात याबाबत उदासीनता होती. मात्र, आता हे चित्र बदलले आहे. ग्रामीण भारतातील किमान ७८ टक्के पालक आपल्या मुलींना पदवीपर्यंत आणि त्यापुढील शिक्षण देण्याची आकांक्षा बाळगतात, असे एका सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे.
२० राज्यांमधील ६,२२९ ग्रामीण कुटुंबांच्या सर्वेक्षणावर आधारित ग्रामीण भारतातील प्राथमिक शिक्षण राज्य-२०२२ अहवाल केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जारी केला आहे. मुलांच्या लिंग वितरणाचे विश्लेषण करताना, निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, पालक त्यांच्या अपत्यांसाठी तांत्रिक पदवी, पदवी आणि पदव्युत्तर पदवीसह प्रगत शिक्षण घेण्याकडे समान कल दर्शवतात. ८२ टक्के मुलांचे पालक आणि ७८ टक्के मुलींचे पालक मुलींना त्यांच्या अपत्यांना पदवी आणि त्यापुढील शिक्षण द्यायचे आहे, असे त्यात म्हटले आहे.
एकूण गळती झालेल्या मुलांपैकी, सुमारे एक चतुर्थांश मुलांनी प्राथमिक शालेय शिक्षणादरम्यान त्यांचे शिक्षण बंद केले, असे सर्वेक्षणात दिसून आले. तुलनेने, त्या टप्प्यावर मुलींच्या गळतीचे प्रमाण जास्त होते, ते ३५ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर मुले आणि मुली दोघांनीही मोठ्या संख्येन शाळा सोडली. मुलांमध्ये हे प्रमाण ७५ टक्के आणि मुलींसाठी ६५ टक्के होते. ग्रामीण भागातील सहा ते १६ वयोगटातील मुलांवर लक्ष केंद्रित करणारा हा अभ्यास डेव्हलपमेंट इंटेलिजेंस युनिट, ट्रान्सफॉर्मिंग रुरल इंडिया फाउंडेशन आणि संबोधी संस्थेच्या पुढाकाराने करण्यात आला होता. यातील आकडे अतिशय बोलके आहेत. ग्रामीण भागातील पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणाविषयी आलेली जागरूकता या अभ्यासातील सर्वात महत्त्वाचा निष्कर्ष ठरला आहे.
शाळांची अनुपलब्धता शिक्षण सोडण्याचे कारण
गावात किंवा जवळपासच्या गावांमध्ये उच्च विभाग असलेल्या शाळांची अनुपलब्धता हे प्राथमिक विभाग पूर्ण झाल्यानंतर ही मुले बाहेर पडण्याचे कारण असू शकते, असे सर्वेक्षणात नमूद केले आहे.
अभ्यासावर आईचीच देखरेख
यात असे आढळून आले की बहुतेक मुले (६२.५ टक्के) त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत त्यांच्या आईच्या देखरेखीखाली असतात, तर ४९ टक्के मुले त्यांच्या वडिलांच्या देखरेखीखाली असतात. म्हणजेच पालकांनी आपल्या मुलांच्या शैक्षणिक उपक्रमांना मार्गदर्शन करण्यात आणि त्यांना घरी पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. शिवाय, ३८ टक्क्यांहून अधिक पालक त्यांच्या मुलांचे शिक्षण अधिक वाढवण्यासाठी खाजगी शिक्षकांची निवड करतात.