|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 24.59° से.

कमाल तापमान : 25.79° से.

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 48 %

वायू वेग : 5.84 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

24.59° से.

हवामानाचा अंदाज

23.83°से. - 25.97°से.

शुक्रवार, 24 जानेवारी छितरे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.47°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home » नागरी, राष्ट्रीय » ‘इंडिया’ आघाडीला संपवायचाय् सनातन धर्म: नरेंद्र मोदी

‘इंडिया’ आघाडीला संपवायचाय् सनातन धर्म: नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, (१४ सप्टेंबर) – स्वामी विवेकानंद आणि लोकमान्य टिळकांनी प्रेरणा दिली तो सनातन धर्म ‘इंडिया’ आघाडीला संपवायचा आहे. आज त्यांनी सनातन धर्मावर टीका करणे सुरू केले, उद्या ते हल्ले वाढवतील. देशभरातील ‘सनातनी’ आणि देशावर प्रेम करणार्या लोकांनी सतर्क राहायला पाहिजे. आपल्याला हे थांबवलेच पाहिजे, असा घणाघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी विरोधकांवर केला. ते मध्यप्रदेशातील बिना येथे एका सभेला संबोधित करीत होते.
जी-२० परिषदेच्या यशाचे श्रेय मोदी नव्हे, तर तुम्हा सर्वांचे आहे. हे तुम्हा सर्वांचे सामर्थ्य आहे, १४० कोटी देशवासीयांचे यश आहे. विरोधकांवर ‘घमंडिया’ म्हणून हल्ला करणार्या नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीवरही टीकेची झोड उठवली. देशात असे काही पक्ष आहेत जे देश आणि समाजाला विभाजित करण्यात गुंतले आहेत. त्यांनी एकत्र येत ‘इंडिया’ आघाडी तयार केली आहे. या आघाडीला काही जण ‘घमंडिया’ आघाडी असेही म्हणतात. यांचा नेता ठरला नाही, नेतृत्वाबाबत संभ्रम आहे. मात्र, ही ‘घमंडिया’ आघाडी कसे काम करेल याचे धोरण आणि व्यूहरचना त्यांनी मुंबईतील बैठकीत ठरवली आहे. त्यांनी आपले एक छुपे धोरण तयार केले आहे, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.
भारताच्या संस्कृतीवर हल्ला करण्याची या ‘घमंडिया’ आघाडीचे धोरण आणि व्यूहरचना आहे. भारताच्या आस्थेवर हल्ला करण्याचा निर्णय ‘इंडिया’ आघाडीने घेतला आहे. हजारो वर्षांपासून भारताला एकसंध ठेवणार्या विचार आणि संस्कारांना नष्ट करणे हा या आघाडीचा हेतू आहे. या ‘घमंडिया’ आघाडीने सनातन संस्कार आणि परंपरा संपुष्टात आणण्याचा संकल्प केला आहे. ज्या सनातनला महात्मा गांधींनी जीवनभर मानले, ज्या सनातन धर्माने त्यांना अस्पृश्यतेच्या विरोधात आंदोलन छेडण्याची प्रेरणा दिली, ती सनातन परंपरा या ‘घमंडिया’ आघाडीला संपुष्टात आणायची आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
सनातनच्या विरोधात उद्या हल्ले
आज या लोकांना सनातनच्या विरोधात उघडपणे बोलणे सुरू केले आहे. हे लोक उद्या सनातनवरील हल्ले वाढवणार आहेत. देशातील प्रत्येक कोपर्यातील सनातनीला, देशावर प्रेम करणार्याला सतर्क राहण्याची गरज आहे. ‘इंडिया’ आघाडीवाल्यांना सनातन धर्म संपुष्टात आणून देशाला हजार वर्षांच्या गुलामगिरीत लोटायचे आहे. मात्र, अशा शक्तींना आपल्याला रोखावे लागेल. एकजुटीने त्यांचे मनसुबे आपल्याला उधळून लावायचे आहेत, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
५०,७०० कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिना येथे ५०,७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी केली. या प्रकल्पांमुळे या क्षेत्रातील औद्योगिक विकासाला ऊर्जा मिळेल. केंद्र सरकारने एका कार्यक‘मात प्रकल्पांसाठी जितका निधी दिला, तितके आपल्या देशातील कित्येक राज्यांचे बजेटही नसते. यावरून तुम्ही कल्पना करू शकता, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

Posted by : | on : 14 Sep 2023
Filed under : नागरी, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g