|
|
पंचांग Vrittabharati
वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी : | करण :
योग : | अयनांश :
ऋतू : | आयन :
सूर्योदय : 7:02 ए एम | सूर्यास्त : 6:18 पी एम
हवामान

किमान तापमान : 23.22° से.

कमाल तापमान : 23.68° से.

तापमान विवरण : broken clouds

आद्रता : 53 %

वायू वेग : 6.13 मी. प्रतिसेकंद

स्थळ : Mumbai, IN

23.22° से.

हवामानाचा अंदाज

22.99°से. - 26.27°से.

शुक्रवार, 24 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

23.33°से. - 26.99°से.

शनिवार, 25 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.01°से. - 27.57°से.

रविवार, 26 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.64°से. - 27.72°से.

सोमवार, 27 जानेवारी टूटे हुए बादल
हवामानाचा अंदाज

25.66°से. - 27.64°से.

मंगळवार, 28 जानेवारी साफ आकाश
हवामानाचा अंदाज

25.05°से. - 27.04°से.

बुधवार, 29 जानेवारी टूटे हुए बादल
Home » नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय » संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांवर होणार चर्चा

संघाच्या समन्वय बैठकीत राष्ट्रीय मुद्यांवर होणार चर्चा

-सामाजिक परिवर्तनासाठीच्या प्रयत्नांवर दिला जाणार भर,
-सुनील आंबेकर यांनी दिली माहिती,
पुणे, (१४ सप्टेंबर) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक पुणे येथे होत असून, या बैठकीत ३६ संघटनांचे २६६ प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पर्यावरणपूरक जीवनशैली, जीवनमूल्यांवर आधारित कुटुंबव्यवस्था, समरसतेचा आग्रह, स्वदेशी आचरण आणि नागरी कर्तव्यांचे पालन या पाच मुद्यांवर बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती रा. स्व. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी आज बुधवारी येथे दिली.
रा. स्व. संघ समन्वय समितीच्या १४, १५, १६ सप्टेंबर या दरम्यान होणार्या बैठकीची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रपरिषदेत आंबेकर बोलत होते. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यावेळी उपस्थित होते. आंबेकर म्हणाले की, संघाचे स्वयंसेवक आपल्या शाखा कार्याच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य अविरत करीत असतात. दैनंदिन शाखेच्या कामाबरोबरच समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत संघाचे स्वयंसेवक विविध सामाजिक कामांमध्ये मग्न असतात. ही सर्व कामे समाजसेवा आणि राष्ट्र उभारणीसाठी सुरू आहेत.
बैठकीत सहभागी होणार्या सर्व संघटना संघप्रेरित असून, सामाजिक जीवनाच्या विविध क्षेत्रांत त्या स्वायत्तरीतीने कार्य करतात. या संघटनांची बैठक वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या बैठकीत या संघटना त्यांचे कार्य व त्यातील अनुभवांची परस्परांमध्ये देवाणघेवाण करतात. या निमित्ताने एकमेकांकडून शिकण्याची आणि एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. या सर्व संघटनांचे उद्दिष्ट आणि लक्ष्य समान आहे. अनेक संघटना विषयानुरूप आणि आवश्यकतेनुसार एकत्र येऊन कार्य करतात, अशी माहिती सुनील आंबेकर यांनी दिली.
समाजासमोर जी आव्हाने येतात, त्यांचा विचार करून कार्याची दिशा निश्चित केली जाते आणि हे कार्य राष्ट्रीय भावनेतून केले जाते, ज्यातून कामाचा वेग वाढेल. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काम करणार्या विविध संघटनांचे प्रतिनिधी बैठकीत सहभागी होणार आहेत. या सर्व संघटना अनेक वर्षांपासून समाजजीवनात सकि‘य असून, त्यांनी आपल्या परिश्रमाने आपापल्या क्षेत्रात महत्त्वाचे स्थान प्राप्त केले आहे. या संघटना आपापल्या कार्यक्षेत्रातील त्यांचे अनुभव बैठकीत मांडतील तसेच राष्ट्रीय आणि वर्तमान परिस्थितीच्या संदर्भातील अनुभवदेखील सांगितले जातील. त्यासंबंधित अनेक विषयांवर बैठकीत मूलभूत चिंतन होईल आणि त्या-त्या संघटनांची आपापल्या क्षेत्रातील आगामी कार्याची दिशा काय राहील, याचीही योजना बैठकीत मांडली जाईल, असे आंबेकर म्हणाले.
सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे तसेच डॉ. कृष्णगोपाल, डॉ. मनमोहन वैद्य, अरुण कुमार, मुकुंद आणि रामदत्त चक्रधर हे सर्व सहसरकार्यवाह आणि प्रमुख पदाधिकारी या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विद्या भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सक्षम, वनवासी कल्याण आश्रम, सेवा भारती, विश्व हिंदू परिषद, राष्ट्र सेविका समिती, भारतीय जनता पार्टी, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ आणि अन्य सहयोगी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या विषयांवर प्रामुख्याने होणार चर्चा
सामाजिक परिवर्तनासाठी सुरू असलेले प्रयत्न, जीवनमूल्यांच्या आधारावर कुटुंबव्यवस्था, दैनंदिन जीवनात पर्यावरण रक्षणाच्या द़ृष्टीने प्रयत्न, स्वदेशी विचारांवर आधारित आर्थिक धोरण, त्याचबरोबर जातिभेद संपुष्टात येईल, असा समरसतापूर्ण व्यवहार अशा अनेक विषयांवर या तीन दिवसांत विचारविनिमय होणार आहे, अशी माहितीही आंबेकर यांनी दिली.

Posted by : | on : 14 Sep 2023
Filed under : नागरी, रा. स्व. संघ, राष्ट्रीय
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g