किमान तापमान : 24.72° से.
कमाल तापमान : 28.99° से.
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 51 %
वायू वेग : 6.9 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
28.99° से.
23.71°से. - 28.99°से.
रविवार, 12 जानेवारी टूटे हुए बादल22.24°से. - 25.52°से.
सोमवार, 13 जानेवारी साफ आकाश23.44°से. - 26.98°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश24.12°से. - 25.88°से.
बुधवार, 15 जानेवारी कुछ बादल24.11°से. - 25.32°से.
गुरुवार, 16 जानेवारी छितरे हुए बादल23.75°से. - 26.28°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलव्यापारी संघटना ‘कॅट’चा आरोप,
नवी दिल्ली, १४ डिसेंबर – देशात किरकोळ व्यवसायाची वार्षिक उलाढाल सुमारे ९५० अब्ज डॉलर्स असून, यातून सुमारे ४५ कोटी लोकांना रोजगार मिळतो. देशातील एकूण व्यवसायाच्या ४० टक्के भाग किरकोळ व्यवसायाचा आहे. मात्र, हा व्यवसाय संपविण्यासाठी आणि त्यावर कब्जा करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या बेकायदेशीरकणे चीनच्या वस्तू विकत आहेत, या ई-कॉमर्स कंपन्या देशाला आर्थिक गुलामगिरीकडे नेत असल्याचा स्पष्ट आरोप देशातील सर्वांत मोठ्या अ. भा. व्यापारी महासंघाने (कॅट) केला आहे.
कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, ई-कॉमर्स कंपन्या त्यांच्या ई-पोर्टलवर विदेशी वस्तू, खासकरून चीनच्या वस्तूंची विक्री करीत आहेत. ई-कॉमर्स व्यापाराद्वारे भारताच्या किरकोळ बाजारात एकाधिकार त्यांचा प्रयत्न आहे. या कंपन्या केंद्र सरकारच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या धोरणासह अनेक कायद्यांना फाटा देत अनियंत्रित आणि मनमानी व्यापार करीत आहेत.
ई-कॉमर्स कंपन्यांच्या व्यापारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘लोकल फॉर व्होकल’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचीही खिल्ली उडवली जात आहे. या कंपन्या देशाच्या आर्थिक भविष्याचा पाया पोकळ करीत असून, त्यामुळे या कंपन्यांवर सरकारचा कायदेशीर वचक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सरकारने शक्य तितक्या लवकर ई-कॉमर्स व्यापारविषयक धोरण जाहीर करावे, ज्या अंतर्गत सशक्त आणि सक्तीचे ई-कॉमर्स नियामक प्राधिकरण गठित केले जावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. लोकल फॉर व्होकल आणि आत्मनिर्भर भारत अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र, राज्य आणि जिल्हा पातळीवर देशभरातील व्यापारी आणि अधिकार्यांची संयुक्त समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.