किमान तापमान : 24.75° से.
कमाल तापमान : 26.24° से.
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 58 %
वायू वेग : 6.52 मी. प्रतिसेकंद
स्थळ : Mumbai, IN
26.24° से.
23.74°से. - 26.99°से.
रविवार, 12 जानेवारी कुछ बादल22.24°से. - 25.48°से.
सोमवार, 13 जानेवारी कुछ बादल23.36°से. - 26.54°से.
मंगळवार, 14 जानेवारी साफ आकाश23.78°से. - 25.15°से.
बुधवार, 15 जानेवारी साफ आकाश23.96°से. - 25.5°से.
गुरुवार, 16 जानेवारी टूटे हुए बादल24.28°से. - 26.06°से.
शुक्रवार, 17 जानेवारी घनघोर बादलनवी दिल्ली, १४ डिसेंबर – लडाखच्या पूर्व सीमेवर आपल्या जवानांनी अतिशय आक्रमक होत, चिनी सैनिकांचा सामना केला. त्यांच्या अभूतपूर्व शौर्यामुळेच चिनी सैनिकांना आपल्या सीमेवरून माघारी फिरणे भाग पडले होते, अशा शब्दांत संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी आज सोमवारी लष्करी जवानांची प्रशंसा केली.
फिक्कीच्या सर्वसाधारण सभेला आभासी माध्यमातून संबोधित करताना ते बोलत होते. भारताच्या हिमालयीन भागात चीनच्या सैनिकांनी अचानक आक्रमण केले. यावरून जग किती झपाट्याने बदलत आहे आणि सीमावादावर अस्तित्वात असलेल्या करारांचे कसे उल्लंघन होत आहे, याचे संकेत मिळतात. चिनी आक्रमणकार्यांचे समोर येण्याचे मार्ग भारतीय जवानांनी अडवले. त्यांच्यात संघर्ष झाला आणि अखेर चिन्यांना माघार घ्यावी लागली. २०२० या वर्षात आपल्या जवानांनी सीमेवर किती मोठे शौर्य गाजवले, यावर आपल्या भावी पिढ्या नेहमीच गर्व करतील, असे राजनाथसिंह यांनी सांगितले.
पाकिस्तान आणि चीनला जोडणार्या सीमांवर नेहमीच नवनवे आव्हान उभे ठाकत असते, पण आपले जवान त्यांचा सामना नेहमीच धैर्याने आणि बहादुरीने करीत असतात. गलवान खोर्यातील आक्रमणाने भविष्यातील बर्याच रूपरेषा बदलल्या आहेत. भविष्यातील अनिश्चिततेचे हे संकेत आहेत. चीन ज्या पद्धतीने सीमेवर बांधकाम करीत आहे, सैन्याची जमवाजमव करीत आहे, त्यावरून भविष्यात काय होणार आहे, याची जाणीव तुम्हाला झालीच असेल, असेही ते म्हणाले.
शेतकर्यांविरुद्ध आक्रमक भूमिका नाही
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. सरकारच्या कायद्यांविरुद्ध आंदोलन करण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे त्यांचे आंदोलन मोडून काढण्याचा, त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कृषी कायदे शेतकर्यांच्याच हिताचे असल्याने, या कायद्यांचे महत्त्व त्यांना आम्ही पटवून देऊ आणि यात आम्हाला एक दिवस नक्कीच यश मिळेल, असा विश्वास राजनाथसिंह यांनी व्यक्त केला.
कृषी क्षेत्र ही आपली माता आहे. तिच्यामुळेच १३० कोटी जनतेला पोटभर अन्न मिळते. शेतकर्यांची दिशाभूल करण्यात आली आहे. त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे सर्वच पर्याय खुले आहेत, असेही त्यांनी सांगितले.